रावेर येथे तालुका विधी सेवा समिती तर्फे मानसिक रुग्ण व मानसिक अपंगत्व/ व्यंग या विषयावर मार्गदर्शन शिबिर
रावेर येथे तालुका विधी सेवा समिती तर्फे मानसिक रुग्ण व मानसिक अपंगत्व/ व्यंग या विषयावर मार्गदर्शन शिबिर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दिपक तायडे, जळगाव : महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय,मुंबई च्या दिनदर्शिका अन्वये तसेच मा.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचे मार्गदर्शना नुसार आज दि. 12 सप्टेंबर 2022 सोमवार रोजी तालुका विधी सेवा समिती,रावेर च्या वतीने दिवाणी व फौजदारी न्यायालय,रावेर येथे NALSA(Legal Service to the Mentally ill and Mentally Disabled Person), Siemens, 2015 मानसिक दृष्ट्या दुर्बल घटकांना NALSA कडून पुरवल्या जाणार्या सेवा या विषया वर दिवाणी व फौजदारी न्यायालय,रावेर येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे अध्यक्षस्थानी मा.न्या.श्री.प्रविण पी. यादव साहेब,अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती,रावेर तथा दिवाणी न्यायाधीश दिवाणी व फौजदारी न्यायालय,रावेर असून साहेबांनी मानसिक दृष्ट्या दुर्बल घटकांना विधीसेवाप्राधिकरणा मार्फत पुरविल्या जाणार्या सेवा तसेच Mental Helth Act 1987 यावर मार्गदर्शन केले, प्रमुख वक्ते डॉ.श्री.योगेश राणे,ग्रामीण रुग्णालय,रावेर यांनी Mentally ill व Mentally Disabled Person यांमधील फरक समजाऊन त्यावर सविस्तर माहिती सांगितली,
या कार्यक्रमास रावेर वकील संघाचेअध्यक्ष ऍड. S. B. सांगळे साहेब, ऍड.सचिव प्रमोद विचवे, सह सचिव ऍड. दिपक गाढे हे उपस्थित होते त्याच प्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड.श्री.दिपक तायडे, प्रास्ताविक अँड.श्री.रमाकांत महाजन, आभार अँड श्री.जगदीश महाजन यांनी केले. तसेच कार्यक्रमाला रावेर कोर्टातील विधीज्ञ व तालुका विधी सेवा समिती चे समांतर विधी सहाय्यक श्री.राजेंद्र अटकाळे, श्री.बालकृष्ण पाटील, श्री.दयाराम मानणारे गुरुजी तसेच सहकारी यांनी सहकार्य केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत