Breaking News

ब्रम्हपुरी तालुक्यात आम आदमी पार्टीला महिलांचा उस्फुर्द प्रतिसाद

 ब्रम्हपुरी तालुक्यात आम आदमी पार्टीला महिलांचा उस्फुर्द प्रतिसाद

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, अश्र्वजित हुमने, ब्रम्हपुरी : आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यांपासून गावागावात फिरून ग्राम शाखा कमिटी स्थापन करण्यात व्यस्त आहे. त्यातच ब्रम्हपुरी तालुक्यातील वायगव येथे दिनांक २७/०९/२०२२ ला पक्षाचे विधानसभा प्रमुख नावेद भाई, तालुका उपाध्यक्ष भास्कर भाई आणि तालुका कोषाध्यक्ष आशू भाऊ यांच्या उपस्थितीत असंख्य महिलांनी पक्ष प्रवेश केला. 

यावेळी विधानसभा प्रमुख यांनी आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल साहेब यांनी महिलांना दिल्ली येथे महिलांसाठी केलेले काम तसेच त्यांना पगार व फ्री बस सुविधा या बाबतीत माहिती देण्यात आली. आता दिल्लीच्या धर्तीवर पंजाब येथे सुरू असलेले काम यावर प्रकाश टाकला. महाराष्ट्र राज्यात जर का आपल्याला इलेक्ट्रिक बिल, पाणी व्यवस्था, शिक्ष्यन ह्या गोष्टी उत्तम दर्ज्याच्या हव्या असतील तर महिलांनी पुढे येऊन केजरीवाल साहेबाचे हात मजबूत करायला हवं असे प्रतिपादन विधानसभा प्रमुख नावेद भाई यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत