Breaking News

२ ऑक्टोंबरला सप्तखंजिरी वादक तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधन

गणेश नगर येथील शारदा मंडळातर्फे विविध कार्यक्रमांची मेजवानी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,संतोष रोकडे, अर्जुनी मोरगाव : सार्वजनिक शारदा उत्सव मंडळ गणेश नगर च्या वतीने नवरात्रोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमांची आयोजन करण्यात आले आहे.प्रख्यात सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य तुषार सूर्यवंशी यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम गांधी जयंती निमित्त २ऑक्टोबरला रात्री आठ वाजता संपन्न होणार आहे.

२९ ला सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धा,३० सप्टेंबरला समाजसेविका किरण कांबळे यांच्या सौजन्याने गरबा नृत्य स्पर्धा आणि १ आक्टोंबर ला स्लो डान्स स्पर्धेचे आयोजन होणार आहे.तीन आक्टोंबरला दुपारी हवन,किंग डान्स अकॅडमीच्या वतीने नृत्याविष्कार,४ ऑक्टोंबर ला महाकाला, हरिपाठ,घट विसर्जन आणि महाप्रसादाचे आयोजन होणार आहे.कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत