पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पळवून नेवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : सेलू तालुक्यातील एका 10 वर्षाच्या अल्पवयिन मुलीस दुचाकीवर पळवून नेवून दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्यावर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.या बाबत सेलू पोलीस ठाण्यात त्या अल्पवयीन मुलीच्या आईने सोमवारी सायंकाळी एक तक्रार दाखल केली त्याद्वारे आपली 10 वर्षीय मुलगी व बहिणीचा मुलगा या दोघांना अज्ञात व्यक्तींनी मोटारसायकलवर पळवून नेले.
जिंतूर तालुक्यातील कौसडी फाट्यावर मुलास मारहान करून ढकलून दिले तर आपल्या अल्पवयीन मुलीवर कोक शिवारात त्या दोघां अज्ञात व्यक्तींनी बलात्कार केला असे नमूद केले.सेलू पोलिसांनी आज मंगळवारी पहाटे या घटनेबदल गुन्हा दाखल केला आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी रवाना झाले आहेत.सेलू पोलिसांनी या प्रकरणात जल्द गतीने तपास सुरु केला आहे.दरम्यान या प्रकरणाचा तपास भाग्यश्री पुरी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत