Breaking News

मुंडीगेट येथील नवयुवक अष्टविनायक मंडळांनी गावातील व शाळेतील परिसर केले स्वच्छ

 मुंडीगेट येथील नवयुवक अष्टविनायक मंडळांनी गावातील व शाळेतील परिसर केले स्वच्छ

महा घडामोडी न्युज शहर प्रतिनिधी, प्रविण चिडे, विरुर : विरुर येथून जवळच असलेल्या छोट्याशा मुंडिगेट गावातील नवयुवक अष्टविनायक मंडळाने नवीन उपक्रम राबवत गावातील चौका चौकातील मुख्य रस्त्यावरील व शाळेचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून गावात मंडळा कडून उपक्रम राबवण्यात येत आहे. हे मंडळ नवनवीन उपक्रम राबवताना दिसून येत आहे शालेय विद्यार्थ्यांना बालकांना आपली कला गुण दाखवता यावे यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम गावात आयोजित करून शालेय विद्यार्थांना कार्यक्रमात सहभागी केल्या जातात.

 नवयुवक मंडळ यांचे कडून शालेय साहित्य पेन बुक इत्यादी या सारख्या वस्तू वाटप केल्या जातात उपक्रम बघून गावातील नागरिका कडून या मंडळाचे कौतुक केले जात आहे. मंडळातील युवा वर्गाने जे उपक्रम करून गावात स्वच्छता राखण्याचे काम केले. यापुढे आम्हीही त्यांचा आदर्श घेऊन गाव स्वच्छ ठेऊ असे गावकऱ्यां कडून व ग्राम पंचायत कडून बोलल्या जात आहे .या उपक्रम राबवण्या करिता मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मालोत. सदस्य महेश लाखावत.आकाश मालोत.रोहित मालोत.संजय राठोड.राहुल भुक्या.इत्यादी सदस्य उपक्रम राबवन्या करिता खूप मेहनत घेताना दिसून येते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत