बिलोली तालुक्यातील शासन परवाना नावाने औषेधीमिश्रित शिंदी विक्री थांबेल का?
बिलोली तालुक्यातील शासन परवाना नावाने औषेधीमिश्रित शिंदी विक्री थांबेल का?
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,राजाराम आळंदीकर, बिलोली : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेएक वर्षापासुन शासन आदेशाने बंद केलेली शिंदी विक्री शासन मान्य बोर्ड लावुन तालुक्यातील सगरोळी ,कुंडलवाडी ,अशा प्रमुख बाजारपेठ असलेल्या ठिकाणी रसायने मिश्रीत शिंदी विक्री मोठ्या प्रमाणात केली जात असुन मानवी आरोग्य धोक्यात घालण्याचे काम सबंधित विक्रीतेच्या मार्फत रोज होताना दिसत आहे बिलोली तालुक्यात शिंदी ताडी बनविण्यासाठी उत्पादक झाडेच शिल्लक नसुन आडातच पाणी नाहीत तर पौर्यात कोठुन येणार ?
विक्रेता हा औषेधीमिश्रित शिदीची विक्री रोज मोठ्या प्रमाणात करीत आहेत. सदर शिंदी डेपोचे मालक तेलंगणातील असल्याचे समजते राज्यात अनेएक विषाणुजन्य आजार झपाट्याने पसरत असतानाच मानव निर्मीत औषेधीमिश्रित शिंदी मानवी निरोगी आरोग्य धोक्यात घालण्याचा प्रकार बिनधक्कपणे चालु आहे तालुक्यात शिंदी उत्पादक झाडेच शिल्लक राहीलेले नाहीत मग शिंदी डेपोचा तेलंगणातील मालक शिंदी कसे बनवतो
हा जनतेसमोर अनुत्तरीत प्रश्न असुन राज्यउत्पादन शुल्क विभागाला हाताशी धरुन छुपा आशिर्वादाने आहे का ? आसाही प्रश्न जनतेसमोर उपस्थित केला जातोय सदर औषेधीमिश्रित शिंदी मुळे डोळ्यांना चिपड येणे,अंधुक दिसणे,पोट दुखणे,असे अनेक आजार औषेधीमिश्रित शिंदी पिणा-यास जडत असुन मानवी आरोग्यास हानी पोहचविणारा मालक माञ मालामाल होताना पहावयास मिळत आहे यासाठी जाणकार जनता सदर रसायन मिश्रीत शिंदी डेपो तात्काळ बंद करण्यासाठी जनतेतुन मागणी जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत