Breaking News

नराधमांना फाशीचीच शिक्षा द्या, सेलू शहर कडकडीत बंद

 नराधमांना फाशीचीच शिक्षा द्या, सेलू शहर कडकडीत बंद

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,सूरज शहाणे, सेलू : दहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोन्ही नराधम आरोपीना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी जोर धरू लागली आहे.जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.गुरुवार 8 सप्टेंबर रोजी सर्व सेलूकरांच्या वतीने शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला तर परभणी,जिंतूर,गंगाखेड,शहरात नागरिकांनी या घटनेचा निषेध करून तहसीलप्रशासनास निवेदन दिले.

सेलू कराच्या वतीने स्वयंस्फूर्तपणे सर्व शाळा,महाविद्यालय,अस्थापने बंद ठेऊन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.शहरातील हुतात्मा स्मारक येथून मोर्चा काढून क्रांती चौकात कडक शासन करण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी प्रेक्षा भांबळे, निर्मला लिपने, मनीषा केंद्रे,अश्विनी घोगरे,हेमंतराव आडळकर,भाऊ सोनवणे, साईराज बोराडे,मिलिंद सावंत, राहुल राजूरकर,विठल कोकर, संदीप बोकन,प्रदीप धापसे,आदिसह सर्व राजकीय सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी पदाधिकारी महिला व बालकांनी सहभाग नोंदवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत