Breaking News

शेतात गेलेला प्रज्वल अजूनही घरी परतलाच नाही

 शेतात गेलेला प्रज्वल अजूनही घरी परतलाच नाही 

पोलिसांकडून कार्यवाही शून्य, नोंद फक्त कागदावरच ?

महा घडामोडी न्युज नेटवर्क, नागपूर : बेला नजिक असलेल्या रामा येथील महादेवजी गौरकर यांचा मुलगा प्रज्वल गौरकर,(वय 19) काल दिनांक 16/10/2022 रोजी सकाळी 9.00 वाजताच्या दरम्यान कामासाठी म्हणून शेतात गेला आणि 24 तास लोटूनही परत आलाच नाही,सदर घटनेची बाब लक्षात येताच मुलाच्या कुटुंबाने बेला पोलिस स्टेशन येथे धाव घेतली, पोलिसांनी बाब ऐकून, गुन्हाची नोंद करून घेतली.

  रामा नाजिक असलेल्या जंगलात गेल्याचे प्राथमिक माहितीच्या आधारे, मुलाच्या कुटुंबाने व गावकऱ्यांनी जंगलात जाऊन. शोध घेत आहेत. 24 तासांचा कालावधी लोटूनही प्रज्वलचा पत्ता लागलेला नाही, कुटुंबाकडून शोध अजूनही चालूच आहे,मात्र पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही, प्रज्वल जंगलात हरविल्याची बातमी गावात पसरताच एकीकडे अत्यंत हळहळ व्यक्त केला जात आहे,आणि दुसरीकडे मुलाला काही झाले असेल,प्राण्यांनी नेले असेल,नोंद फक्त कागदावरच असते,हे लोकं मदत करत नाही, अश्या अनेक प्रश्नांच्या खमंग चर्चेला उधाण आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत