दसरा निमित्त आदिवासी समाजातर्फे ब्रम्हपुरी येथे रावण महापूजा आयोजन
दसरा निमित्त आदिवासी समाजातर्फे ब्रम्हपुरी येथे रावण महापूजा आयोजन
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, अश्र्वजीत हुमने, ब्रम्हपुरी : आज दसरा हा सण. या दिवशी भगवंत रघुनंदन राम यांनी माता सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्तता झाली. यात रघुनंदन राम यांनी रावणाशी वानरसेनेला धरून युद्ध केले व रावणला युद्धात पराभूत केले. आणि हाच दिवस म्हणजे अच्छाई पे बुराई की जीत असे म्हतल्या जाते. आज सर्वत्र रघुनंदन राम, सीता माता, आणि लक्ष्मण यांचा देखावा तयार करून रामजी यांच्या हस्ते रावण दहन केल्या जाते.
परंतु याच ठिकाणी आदिवासी समाजानी ब्रम्हपुरी येथे रावण महापूजा करण्यात आयोजन केले. रावण हे आदिवासी राजा होते आणि त्यांचं दहन केल्या जाऊ नये अशी आदिवासी समाजाची इच्छा आहे. यासाठी ब्रमहपुरी शहरातील स्थित नागरिक यांनी मिरवणुक काढली आणि मिरवणुक ही शहराच्या मुख्य मार्गाने निघून नारायण सिह उईके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
व स्वागत मंगल कार्यालय येथे रावण महापूजा करण्यात येत आहे असे सांगितले. आज आदिवासी समाजाकडून रावणाचे दहन न करता पूजा होत आहे ही बाब पाहायला मिळाली यात असंख्य आदिवासी नागरिक उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत