Breaking News

दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तीसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराचे आयोजन

 दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तीसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराचे आयोजन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखनी तालुक्यातील पालांदुर चौरस येथील गोविंदा विद्यालय येथील विद्यालयात दिव्यांग वयोवृद्ध व्यक्तीसाठी राष्ट्रीय वयोश्री योजना शिबिराचे आयोजन आज दिनांक 4-10-2022 रोज मंगळवार ला सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत घेण्यात आले,सदर कार्यक्रमाचे आयोजन भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.सुनीलजी मेंढे यांनी केले, शिबिरामध्ये वयोवृद्ध व दिव्यांगाना तीन चाकी सायकल एलबो कबड्डी कुबडी काठी रोलेटर वाकर कृत्रिम अवयव मोटार सायकल तीन चाकी सायकल श्रवण यंत्र मतिमंद किट मोबाईल फोन अंधकाठी आणि ब्रेल किट सारखे साहित्य वाटप करण्याच्या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराच्या कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने सविता कापसे जि प सदस्या,मा.महेश शितोळे तहसीलदार लाखनी, डॉ.शेखर जाधव गट विकास अधिकारी लाखनी, डॉ.हटनागर आरोग्य अधिकारी लाखनी,शिवरामजी गिर्हेपुंजे भाजपा जिल्हाध्यक्ष भंडारा, योगिताताई झलके पं स सदस्या लाखनी, सविता राघोर्ते, अश्विनी मोहतूरे, पंकज रामटेके सरपंच ग्रामपंचायत पालांदूर चौ., केशव बडोले सरपंच ग्रामपंचायत कवलेवडा, हेमराज कापसे उपसरपंच ग्रामपंचायत पालंदूर, स्वप्निल खंडाईत उपसरपंच ग्रामपंचायत कवलेवाडा, धनंजय घाटबांधे भाजपा लाखनी तालुकाध्यक्ष,

 अजय गायधनी, सत्यवान वंजारी, देवेश नवखरे, बाळाभाऊ शिवणकर, उमेश गायधने शुभम प्रधान भारत नंदा गवळी अजय ब्राह्मणकर स्वप्निल निमकर प्राचार्य शेंडे गोविंद विद्यालय पालांदूर, प्रा.निंबेकर संताजी महाविद्यालय पालांदूर, श्री बावनकुळे गटशिक्षणाधिकारी पं स लाखनी, जांभूळकर तालुका कृषी अधिकारी लाखनी, पंधरे मंडळ अधिकारी पालांदूर, टोपरे ,करसाळे, हटनागर,कौआवार,उरकुळकर नायब तहसीलदार लाखनी, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश नवखरे, प्रास्ताविक डॉ शेखर जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन जांभूळकर यांनी मानले.

   आयोजित शिबीरामध्ये स्थानिक पालांदूर तसेच परिसरातील दिव्यांग व वयोवृद्ध एकूण सहाशे लाभार्थ्यांच्या नावाची नोंदणी केली, शिबिर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता संगणक चालक, कोतवाल, पोलीस प्रशासन, तलाठी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, आणि भाजपा कार्यकर्ते यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत