तहसीलदाराचे आदेश कायम, माणिकगड सिमेंट कंपनीची अपील खारीज
तहसीलदाराचे आदेश कायम, माणिकगड सिमेंट कंपनीची अपील खारीज
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,कोरपना : महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 161 व 165 अन्वये दिनांक 07/07/2020 ला तहसीलदार राजुरा यांनी माणिकगड सिमेंट कंपनीच्या नोकरी माईन्स वर रस्त्यावरील अतिक्रमण अनाधिकृत बांधकाम व रस्त्यावर गेट बसवून आठ ते दहा गावाला जाणारा रस्ता रोखण्याचं कार्य कंपनीकडून केल्या जात होतं. याबाबतची तक्रार तहसीलदार राजुरा यांच्याकडे 2019 मध्ये दाखल करण्यात आली होती.
सदर प्रकरणात नोकरी कुसुंबी आसापूर या रस्त्यावर कंपनीने अतिक्रमण करून, वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. सदर कंपनीच्या मायनिंग लिज करारामध्ये मुद्दा क्रमांक पाच पार्ट क्रमांक तीन मध्ये सदर रस्त्यावर कोणतेही बांधकाम करता येणार नाही, असे नमूद करण्यात आले होते. व याबाबतचा अहवाल 15 11 1984 मध्ये उपविभागीय अधिकारी यांनी नमूद करून, रस्त्यावरील कोणतेही बांधकाम करता येत नाही, असे नमूद असताना कंपनीने या रस्त्यावर अडथळा निर्माण करून जाणार येणाऱ्यांना प्रतिबंध केले होते.
सदर आदेश तहसीलदार यांनी दिनांक 07/07/2020 ला पारित करून, रस्ता तातडीने खुला करून द्यावा व आदेशाची अंमलबजावणी करावी असे निर्देश दिले होते. मात्र कंपनीने या आदेशाविरुद्ध उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे रा, मा, क्र. ०३ / एल.एन.डि, 3० /१९.२० केस क्र२२ , २०२० दाखल करून, स्थगण आदेश मानिकगड कंपनीने मिळविला. या प्रकरणाची सुनावणी घेऊन तहसिलदार यांचे आदेश कायम ठेवित अपिल खारीज केली.
तसेच मंडळ अधिकारी याना आदेशाची अमलबजावणीचे निर्देश दि, २९.९.२०२२ला आदेश दिले. कंपनीच्या वतिने ॲड, पुरानकर यांनी युक्तीवाद केला. मंडल अधिकारी साळवे, तलाठी वडस्कर, यांनी दि 04/10/2022 रोजी रस्त्याची मौका पाहणी व वस्तुस्थीती अहवाल पंचनामा करूण, उपविभागीय अधिकारी यांना सादर केला असून, कंपनीने रस्त्यावरील अतिक्रमण व गेट खुले केले नसल्याचे उघड झाले. कार्यवाही कडे गावकऱयाचे लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत