ग्रामपंचायत कार्यालयातील नेते मंडळीची अनाधिकृत फोटो त्वरित हटविण्यात यावेत
पारनेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील नेते मंडळीची अनाधिकृत फोटो त्वरित हटविण्यात यावेत : अविनाश पवार
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठूबे, पारनेर : तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयातील महापुरुशांची फोटो व्यतिरिक्त विवीध राजकीय पक्षाच्या कार्यकर्ते सह नेते मंडळी ची अनाधिकृत फोटो कशाच्या आधारे लावलेली आहेत याचा खुलासा गट विकास अधिकारी यांनी करुन पारनेर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत मध्ये अशा प्रकारे फोटो लावलेले आहेत अशा ग्रामपंचायत च्या ग्रामविकास अधिकारी याच्या वर सरकारी कार्यालयाचे अनाधिकृत फोटो लाऊन विद्रूपीकरण केल्यामुळे कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मनसे चे जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी निवेदनाद्वारे गट विकास अधिकारी पंचायत समिती पारनेर यांना केली आहे जर आठ दिवसांत हे सर्व अनाधिकृत नेते मंडळी ची फोटो शासकीय कार्यालयातून काढली नाही तर मनसे स्टाईल खळखट्याक आनदोंलण करण्याचा इशारा मनसे माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार व नितीन म्हस्के सहकार सेना जिल्हा अध्यक्ष यानी गट विकास अधिकारी यांना दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत