पारनेर बसस्टॉप तसेच काॅलेज परिसरात मुलींची छेड काढणाऱ्या टगेखोरांचा त्वरित बंदोबस्त करावा
अविनाश पवार मनसे माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अहमदनगर
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, दत्ता ठूबे, पारनेर : शहरामध्ये असणार्या शाळा आणि काॅलेज सुटल्यावर पारनेर बस स्टॉप तसेच काॅलेज परिसरात मुलींची छेड ,छाड काढणार्या घटना घडत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाल्यामुळे पारनेर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री. बळप साहेब यांची भेट घेऊन बस स्टॉप तसेच काॅलेज परिसरात संबंधित घटणाची माहिती देऊन टगेखोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी निवेदन देऊन पोलिस प्रशासनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी केली यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के सह महाराष्ट्र सैनिक होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत