दृष्टीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत कवी जितेश कायरकरचा वाढदिवस साजरा
दृष्टीबाधित दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत कवी जितेश कायरकरचा वाढदिवस साजरा
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : मुलांसाठी देऊयात घासातला घास आपण सगळ्यांनी मिळूनी साजरा करूयात वाढदिवस एकतरी तास.आपण आज आधुनिक पध्दतीने खूप थाटामाटात मोठमोठ्या हाँटेलमध्ये तर लाँनमध्ये मित्रांसमवेत वाढदिवस साजरा करीत असतो परंतु. ज्या मुलांना खरी डोळस व्यक्तींची गरज असते. अशा मुलांसोबत फार क्वचितच जन वाढदिवस साजरा करतात.
म्हणून युवा साहित्यिक व कवी जितेश कायरकर यांने कसलाही गाजावाजा न करता अगदी साध्या पध्दतीने आनंद अंध विद्यालयाच्या परिसरात अंध मुंलासमवेत सामाजिक कर्तृत्व म्हणून अंध मुलांच्याही अंधारात एक दिवा लावू व त्यांना गुणवत्ताने प्रकाशात आणू ही संकल्पना वापरून मुलांसाठी खाऊ, गोड पदार्थ व केक देवून वाढदिवस साजरा केलाय. यावेळी, अंध शाळेचे गृहपाल रमेश पप्पूलवार, देशमुख, तनुजा सव्वाशेरे, मुख्याध्यापक सेवकराम बांगडकर व कलाशिक्षक परमानंद तिराणिक, प्राध्यापक नीरज आत्राम आणि नंदु गोखरे, शुभम दौलतकर असे मित्रमंडळी व इतर कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत