Breaking News

'त्या' सुरजागड प्रकल्पातील हायवाने वाहनाने ऑटोसह सात दुचाकींना उडविले

 'त्या' सुरजागड प्रकल्पातील हायवाने वाहनाने ऑटोसह सात दुचाकींना उडविले

 गोंडपिपरी येथील घटना : तिघे गंभीर जखमी

 सुरजागड लोह प्रकल्पातील हायवाने गोंडपिपरी येथील संदीप बारसमोर ऑटो, सायकलस्वार व सात दुचाकींना धडक दिली. यात तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी २.३० वाजता घडली.


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : गोंडपिपरी राज्य महामार्गावरून सुरजागड लोह प्रकल्पाकडे भरधाव वेगाने जाणान्या हायवाने एम एच ४० बी जी ८३०४, गुरुवार दुपारी २ वाजता ऑटो. सायकलस्वारासह सात दुचाकींना उडविले. या अपघातात गोंडपिपरी येथील धनराज झाडे, माया झाडे व सोमनपल्ली येथील प्रकाश चुधरी हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी तहसीलदार के. डी. मेश्राम, ठाणेदार जीवन राजगुरू हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.


१५ दिवसांपूर्वीही घडला होता अपघात - 
सुरजागड प्रकल्पाने सामान्यांना रोजगार मिळेल ही अपेक्षा होती, पण आता हा प्रकल्प गोंडपिपरी तालुक्यातील नागरिकांचे जीव घेऊ लागला आहे.१५ दिवसांपूर्वी सुरजागडकडे जाणारे वाहन मुख्य मार्गावरील घरात घुसले होते. या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले होते. यात वाहनचालकाचाही मृत्यू झाला होता. वारंवार होत असलेल्या अपघातामुळे नागरिकांत कमालीची धास्ती पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत