Breaking News

कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती नियम धाब्यावर जिनिंग मध्ये शेतकऱ्याची सर्रास लुट

 कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती नियम धाब्यावर जिनिंग मध्ये शेतकऱ्याची सर्रास लुट 

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी संतोष मडावी, कोरपना : कोरपना कृषी उत्पन्न बाजार समिती नियम धारेवर ठेऊन प्रशासक व सचिवाचे दुर्लक्ष होत असल्याने, शेतकऱ्यांची सर्रास लुट होत असताना, कोरपना बाजार समिती क्षेत्रात अनेक जिनिंग धारकांनी सोयाबीन खरेदी केल्या. बाजार समितीचे शेअर्स बुडवले जात असताना, मोजमाप काटा पासिंग झालेले नाही. तसेच राज्यभर दलाली बंद असताना, सर्रास दलाली व नेट कॅशच्या नावावर २ % लुट होत आहे. कोरपना येथे लिलावाचे वेळापत्रक नाही. 

कोरपना येथे व्यापाऱ्याचा दरात धान्य विक्री होत असताना, बघ्याची भूमिका कर्मचारी व सचिव हे पदाधिकारी घेत असून, बाजार समितीच्या उत्पन्नाला चुना लावीत आहेत. बाजार समितीने तत्काळ भुई काट्याची व्यवस्था यार्डवर करावी. बाजार समितीचे तत्कालीन सभापती गोडे यांना केली होती.तरी याांच्यावर कार्यवाही झालेली नव्हती, गतवर्षी व्यापारी काटयात गैरव्यवहार उघड पडले होते. या चालु हंगामात हजारो क्वििंटल सोयाबिज खरेदी करून जीनिंग धारकांनी व व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे शेअर्स बुडवले आहे. व हजारो क्वििंटल सोयाबीन खरेदी विक्री व्यवहार जिनिंग धारकांनी केले असताना, बाजार समितीकडे कोणतेही नोंदणी नाही. 

सदर कोरपना तालुक्यातील कापूस खरेदिचा परवाना आहे. परंतु त्यांना तेलबिया व कडधान्याचा परवाना नसून, शेतकऱ्याचे थेट सोयाबीन सर्रास जिनिंगवाले खरेदी करत आहे. राज्यात कसल्याही प्रकारची दलाली नसतााना, व्यापारीच दलाल बनून शेतकऱ्याची लुट करत आहे. सौदा पट्टी न फाडता व्यवहार सुरू आहे. हि मोठी गंभीर बाब असून शेतकरी हतबल व अतिवृष्टी पावसाने संकटात असताना, शेतकऱ्याची लुट करून जखमेवर मीठ चोळत आहे.यामध्ये बाजार समितीचे साटे लोटे असल्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक लुट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे .यामध्येेेे बाजार समितीच्या प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्याची तत्काळ लुट थांबवावी, अन्यथा शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

 प्रशासक व सचिवांशी संपर्क केले असता, प्रशासकांनी मी गर्दी मध्ये असल्याने मी या विषयावर बोलू शकत नाही असे उत्तर दिले. तसेच कवडू देरकर यांनी आम्ही शेतकर्यांना प्रशिद्दी पत्रकाद्वारे शेतकऱ्यांनी आपला माल मार्केट यार्ड मध्ये लीलावा मध्ये विक्रीस आणावा असे आव्हान केले आहे तसेच जीनिग मध्ये थेट खरेदी विक्री होत असल्याची माहिती मिळाली आहे शेतकर्याची तक्रार प्राप्त झाल्यास वजन व दलाली सबंधात तक्रार प्राप्त झाल्यास कायदेशीर कारवाही करू असे सांगितले. डॉ. कवडू पिंपळकर कोरपना मराठी पत्रकार संघ अध्यक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत