बस चालवने बेतु शकते प्रवाशांच्या जिवावर
बस चालवने बेतु शकते प्रवाशांच्या जिवावर
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, गजानन बावस्कर, बोदवड : बोदवड सध्या दिवाळी भाऊबीजची लगभग सुरु असुन हजारो प्रवासी बसमध्ये प्रवास करतात. मोबाईल आज अन्न, वस्त्र, निवारापेक्षा माणसाची अत्यावश्यक गरज झाली आहे. मग तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात असो, पन वाहन चालवताना मोबाईल वर बोलल्यामुळे अपघात सुद्धा तेवढेच होत आहे. त्यामुळे किमान ड्युटीवर असताना तरी मोबाईल वापरने टाळावे "नजर हटी, दुर्घटना घटी" हि म्हण त्यासाठीच आहे.विषेश म्हणजे कोणत्याही वाहन चालकाने गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे म्हणजे स्वतःच्या जीवाशी व दुसर्यांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे.
एका हाताने मोबाईलवर बोलणे व दुसऱ्या हाताने बस चालवण हे प्रवाशांच्या व बस चालकाच्या जिवावर बेतु शकते, क्रुपया असे कोणत्याही बस चालकाने करु नये. संदीप साठे,आगार प्रमुख,मुक्ताईनगर



कोणत्याही टिप्पण्या नाहीत