सुबई ग्रामपंचायत कार्यकारिणी गठीत
गुप्त मतदान पध्दतीने उपसरपंचाची निवड
काँग्रेस पक्षाचे सुरेखा आत्राम सरपंच तर रामलू राठोड उपसरपंच म्हणून विराजमान
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,सुभाष अलगमकर, राजुरा : 17 ऑक्टोबर रोजी लागलेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात सुबई ग्रामपंचायत मध्ये काँग्रेस पक्षाचे आठ उमेदवारासह दणदणीत विजय मिळवला परंतु उपसरपंच निवड लांबणीवर असल्याकारणाने कार्यकारिणी गठीत झालेली नव्हती त्यामुळे दि 11 नोव्हेंबर रोजी मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ३० अन्वये नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच यांच्या निवडणूक कामी विशेष सभा घेण्यात आली.
t
उपसरपंच पदाकरिता काँग्रेस पक्षाचे रामलू राठोड तर शेतकरी संघटनेचे किरण सत्रे असे दोन उमेदवार उभे असल्याने सदर निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली यात रामलू राठोड यांनी सात तर किरण सत्रे यांना दोन मते मिळाली त्यामुळे रामलू राठोड यांना उपसरपंच पदाचे दावेदार म्हणून घोषित करण्यात आले ही विशेष सभा निवडणूक निरीक्षक मा. मनोज गौरकर विस्तार अधिकारी शिक्षण पंचायत समिती राजुरा व मोरेश्वर कोमटी ग्राम विकास अधिकारी चुनाळा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया रीतसर पार पडली.
याप्रसंगी काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या सर्व उमेदवार काँग्रेसचे नेते स्व प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नी श्रीमती सुमनताई मामुलकर यांचा आशीर्वाद घेतला तसेच सर्व विजयी उमेदवारांना अभिजित भुते, भीमय्या अंगलवार, भाऊजी जाबोर, प्रकाश अंगलवार, बळीराम चव्हाण, बंडू येलमुले, अनिल कुरवटकर, भिवा कळाबे यांनी पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत