Breaking News

वराड येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत सौ. मनिषा अजय पाटील ह्यांनी मारली बाजी

  वराड येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत सौ. मनिषा अजय पाटील ह्यांनी मारली बाजी

महा घडामोडी न्युज जिल्हा विशेष प्रतिनिधी, जिया शेख, जळगाव : बोदवड तालुक्यातील वराड येथे आज सरपंच निवडीची प्रक्रिया ग्रामसेवक श्री गणेश चोले भाऊसाहेब यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात पार पडली. ७ पैकी ७ सदस्यांनी १००% पाठिंबा दर्शवत स्पष्ट बहुमताने एक तरुण तडफदार चेहरा सौ मणिषा अजय पाटील यांना निवडून दिले. बोदवड तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या ग्रामपंचायतीवर NCP झेंडा फडकल्याने तालुक्यात NCP च्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रसंगी गावातील शेकडों गा्मसथ उपस्थित होते, सर्वांनी नवनिर्वाचित सरपंच यांचा सत्कार करून,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शुभेचछुक विजय चौधरी-जळगाव जिल्हा सरचिटणीस युवक साळशिंगी, बोदवड आबा पाटील रामदास भाऊ पाटील, शांताराम मोझे, मधुकर मोझे, गणेश मोझे, गणेश पाटील, जयराग वाघ, अशोक भिल इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत