Breaking News

"अहमदनगर"चे नाव "अहिल्या नगर" मार्गी

 बहुजन हृदय सम्राट आ.गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांना यश

"अहमदनगर"चे नाव "अहिल्या नगर" मार्गी

गजानन दिवनाले, ऑल इंडिया मल्हार नवयुवक सेना, तालुका अध्यक्ष, खामगाव

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,मीनाताई रहिंज, अहमदनगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला. त्या "अहमदनगर" जिल्ह्याचे नाव बदलून "अहिल्या नगर" करण्या बाबतची बहुप्रतिक्षित आमच्या धनगर समाजची मागणी गेल्या कित्येक वर्षा पासून शासन दरबारी धूळ खात पडली होती.या अगोदरच्या कित्येक सरकारांनी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने राजकारण केले.मात्र केवळ स्वार्थाचे राजकारणा साठी... असे असतांना गेली कित्येक वर्षे आमच्या समाज नेत्यांनी व तसेच समाज संघटनांनी सुद्धा आंदोलने,मोर्चे सुद्धा काढलेत.मात्र राजकारण म्हणून गेल्या कित्येक सरकारांनी मी तर म्हणेल प्रस्थापितांनी आमच्या मागणी कडे जाणून बुजून चाल ढकल करून केवळ आज पर्यंत राजकारण केल्या गेले.

समाज बांधवांना मी आपणास सांगू इच्छितो की,या पूर्वी "महाविकास आघाडी"सरकारने "औरंगाबाद"चे नाव बदलून "संभाजी नगर" व "उस्मानाबाद"चे नाव बदलून "धाराशिव" केले.मात्र आमच्या कित्येक वर्षाच्या "अहमदनगर" शहराचे नाव "अहिल्या नगर" करण्या साठी "महाविकास आघाडी"ने हेतुपुरस्सर आमच्या मागणी कडे दुर्लक्ष केले.अखेर "शिंदे-भाजपा" विध्यमान सरकारने आमच्या करोडो धनगरांच्याच नव्हे तर 11 कोटी महाराष्ट्र वाशीयांची अस्मिता असलेल्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर"यांचा जन्म ज्या जिल्ह्यात झाला.त्या "अहमदनगर" शहराचे नामांतर "अहिल्या नगर" साठी हिरवी झेंडी दिली.

याचे सर्वस्वी श्रेय आमचे समाज नेते बहुजन हृदय सम्राट,सर्व सामन्याचा बुलंद आवाज आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून त्या साठी आमदार महादेवराव जानकर आणि आमदार प्रा.राम शिंदे साहेब यांचा सुद्धा मोलाचा वाटा असून अखेर काल विधिमंडळाच्या सभागृहात त्याला मान्यता देण्यात आली.त्या साठी बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांचे विशेष दीड ते दोन कोटी धनगर समाज बांधवांचे वतीने मी अशोक पातोंड धनगर अभिनंदन करतो. त्याच बरोबर या मागणी साठी वेळोवेळी प्रयत्न करणाऱ्या आमदार महादेवराव जानकर,प्रा आ.राम शिंदे साहेब यांचे सह महाराष्ट्र सरकार विशेषतः शिंदे-फडणवीस सरकारने आमच्या श्रद्धास्थान,अस्मिता असलेल्या "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर" यांच्या जन्मभूमी असलेल्या "अहमदनगर"चे नामकरण "अहिल्या नगर" करण्या साठी हिरवी झेंडी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत