श्री स्वामी समर्थ दर्शन मालिकेची यशस्वी सांगता
श्री स्वामी समर्थ दर्शन मालिकेची यशस्वी सांगता
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, मुंबई : महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक तसेच श्री स्वामी समर्थ यांचे भक्तगण यांच्यासाठी खास श्री स्वामी समर्थ दर्शन ही मालिका एक जानेवारी 2022 पासून आशारत्न या युट्युब चैनलवर प्रसारित केली गेली. या मालिकेचे सादरीकरण पनवेलचे अभिनेता रत्नकांत म्हात्रे यांनी केले. दर दिवशी एक भाग याप्रमाणे दररोज स्वामी समर्थ यांचे दर्शन भक्तगणांना होत राहिले .याचा महाराष्ट्रातील तसेच सर्व भारतातील स्वामी भक्तांना उत्तम लाभ झाला आणि होत आहे , त्यामुळे स्वामी समर्थ यांची विस्तृत माहिती सर्वांना होत गेली.
आपणा सर्वांच्या आशीर्वादाने 31 डिसेंबर 2022 रोजी म्हणजे वर्षाच्या 365 व्या दिवशी श्री स्वामी समर्थ दर्शन या मालिकेचा शेवटचा 365 वा भाग साजरा करीत आहे. ही मालिका दैनिक स्वरूपात असून दरवर्षी आपण ती 1 जानेवारी ते 31 डिसेंबर अशी दररोज नियमित पाहून प्रत्येकाला याचा लाभ कायमस्वरूपी घेता येईल .अशा तऱ्हेने या मालिकेची आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यशस्वी सांगता करीत आहोत. आपणा सर्वांची अध्यात्ममधील रुची पाहून आपणास सांगण्यास आनंद होत आहे की 1 जानेवारी 2023 पासून भगवत गीतेवर आधारित " गीतारत्न " ही नवीन मालिका आशारत्न या चॅनेलवर मराठीमध्ये आणि होप्स स्टार या चॅनेलवर हिंदी मध्ये खास आपणासाठी घेऊन येत आहोत असे अभिनेता रत्नकांत यांनी सांगितले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत