Breaking News

अंगणवाडीतील लहान मुलांच्या पोषण आहारात निघाल्या अळ्या आणि जाळ्या

 लहान मुलांच्या जिवास धोका निर्माण झाला तर याचा जबाबदार कोण ?

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, बीड : गेवराई तालुक्यातील रामपुरी हद्दीतील मनुबाई जवळा येथील अंगणवाडीत प्राप्त झालेल्या आहारातील गव्हाच्या भाड्यामध्ये चक्क अळ्या आणि जाळ्या आढळून आले आहेत, या प्रकारामुळे पालक वर्गातून संताप व्यक्त होऊ लागला असून, शासन मुलांच्या आरोग्यासी खेळत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. या गंभीर प्रश्नाकडे जिल्हाधिकारी मॅडम यांनी स्वतः लक्ष घालावे असी मागणी समस्त मनुबाई जवळा गावकरी व पालक वर्गातून होत आहे.

गेवराई तालुक्यातील मनुबाई जवळा येथे चार दिवसांपूर्वी अंगणवाडीतील बालकांसाठी धन्य प्राप्त झाले, आज दुपारी त्यातील गव्हाचा भरडा बाहेर काढण्यात आला असता, त्यामध्ये जाळ्या आणि अळ्या आढळून आल्या, मनुबाईजावळा येथील सरपंच दिगंबर खरात यांनी सहज पाहणी केली असता हा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.

 याकडे जिल्हा अधिकारी मॅडम ह्या व्यक्तीक लक्ष देतील का ? या प्रकरणांमध्ये कोण कोण इन्व्हायलेट आहेत त्यांची चौकशी होईल का ? लहान मुलांसाठी आलेल्या अल्पहारात जाळ्या आणि आळ्या निघणे ही खूप लज्जास्पद बाब आहे, लहान मुलांच्या आरोग्याची खेळणे ही अयोग्य बाब असल्याचा दावा गावकरी करत आहेत. तरीही सर्व यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे असे सर्व पालक वर्गातून बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत