महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना जगदंब प्रतिष्ठान सामाजिक संघटना ईटखेडा तर्फे पाणपोईची सुविधा
महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना जगदंब प्रतिष्ठान सामाजिक संघटना ईटखेडा तर्फे पाणपोईची सुविधा
भाविकांना मिळणार थंड पाणी व सरबत संघटनेचा स्तुत्य उपक्रम
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, संतोष रोकडे, गोंदिया : अर्जुनी मोर तालुक्यातील प्रतापगड येथे महाशिवरात्रीनिमित्त पाच दिवस यात्रा भरते, जागृत महादेव म्हणून प्रसिद्ध असलेले प्रतापगड येथे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील भाविक दर्शन घेत असतात. प्रतापगड येथे जाण्यासाठी भाविकांना अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यापैकी एक असलेले राज्य महामार्ग 275 वर असलेले इटखेडा ईसापुर महागाव प्रतापगड हा मार्ग असून, या मार्गाने जाणाऱ्या भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ईटखेडा येथील जगदंब प्रतिष्ठान सामाजिक संघटना यांच्या वतीने इसापूर गावाजवळील प्रतापगड ला जाणाऱ्या मार्गावर पानपोईची तसेच सरबताची निशुल्क सेवा भाविकांसाठी करण्यात आलेली आहे. याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन जगदंब प्रतिष्ठान सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
या पानपोईच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पाटबंधारे विभागाचे युगल किरसान माझी प्राचार्य लहू बोळणे, शिक्षक देवराम चांदेवार, केवळ शेंडे, मन्साराम चांदेवार, सुधाकर लांजेवार, रायभान गेडाम, उमेश लांजेवार, शुभम चांदेवार व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यात जगदंब प्रतिष्ठान सामाजिक संघटनेचे अध्यक्ष वलय कुमार चव्हाण, उपाध्यक्ष परमानंद दोनाडकर, सचिव आनंद डोंगरे, कोषाध्यक्ष कुणाल लांडगे, सहसचिव संदीप कुंबरे, सदस्य किशोर मडावी, मिलिंद येरणे, हिमांशू हटवार, समीर पुराम, तुषार हटवार, नितेश भोयर, मिथुन भोयर, शुभम लोणारे, गौरव देशमुख, साहिल मेश्राम, मनोज कोरचे, ज्ञानदीप डोंगरे, सुरज पुराम, कृष्णा कोरचे, भूपेश नागपुरे हे अथक परिश्रम घेत आहेत.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत