Breaking News

..त्या नरभक्षक वाघाला सात तासांच्या रेस्कुनंतर केले जेरबंद

जंगलातून वाघ, बिबट येऊन मानव, जनावरांचा शिकार केल्यानंतर वन अधिकाऱ्यांचे उघडतात डोळे

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, चंद्रपूर : जिल्ह्यातील सिंदेवाही शहरापासून पाच ते सहा किलोमीटरवर असलेल्या मुरमाडी (कोठा) गावातील एका घरात रविवारी सकाळच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या शिरला याची माहिती गावकऱ्यांना मिळताच गावात एकच खडबड उडाली, अखेर सात तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

सिंदेवाही तालुक्यात मागील काही दिवसांपासून वाघ बिबट्या सारख्या हिंस प्राण्यांचा वावर सातत्याने दिसून येत आहे. दरम्यान सिंदेवाही उपवन परिक्षेत्रातील मुरमाडी (कोठा) गावातील अंबादास चिरकुटे श्रीरामे यांच्या घरात रविवारी सकाळी बिबट्या मागच्या दारातून शिरला, याची माहिती पसरतात गावात एकच खडबड उडाली. सुदैवाने घरात त्या दरम्यान कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत