चिखलापार येथे नाटका दरम्यान पोलीस पाटील व हवालदार यांना जबर मारहान
चिखलापार येथे नाटका दरम्यान पोलीस पाटील व हवालदार यांना जबर मारहान
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोदकुमार डांगरे, बेला : बेला पासुन 28 कि. मि. अंतराव उमेड तालुक्यातील चिखलपार येथे कास्तकार नाटय मंडळ चिखलापार यानी आयोजीत केलेल्या नाट्य प्रयोगात किरकोळ वादावरून दोन पोलीस सिपायासह पोलीस पाटलास मारहान, झाल्याचे वृत्त समोर आहे.
सविस्तर वृत्त असे कि चिखलापार ता. उमरेड येथील कास्तकार नाट्य मंडळ यानी जयताळा नागपूर येथील कलावंताचे नाटकतेजराम भगत चिखलापार याच्या शेतात होते . तिकीट विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याने नाटकास खेड्यापाड्यातून मोठ्या प्रमाणात गर्दि होती. यातच आरोपी दिपक शेखलाल चौहान (२२) रा. मांडवा तालुका भिवापूर. याने मधपाशन करून शामियान्याच्या मध्यभागी एक पेक्षा जास्त खुर्च्या घेऊन बसला असल्यामुळे मागील प्रेक्षकांना नाटक दिसत नसल्यामुळे आयोजका पैकी एकाने विचारणा केली असता वाद सुरु झाला. यात पोलीस पाटील अमित निळकंठ राऊत महालगाव यानी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला असता.
सह आरोपी शेखलल पांडूरंग चौव्हान' (46) गुलाब' महादेव पवार (32) सुरज भाऊराव पवार (25) दिनेश नेहरू जाधव (27)प्रविन सदाराम चौहान (26) सुनिल शेखलाल चौव्हान (26) कौसल्या रुपचंद पवार (55) प्रेमिला नानू राठोड (45) चमिराबाई पांडुरंग चौहान (6०) सुनिता शेखलाल चौहान (4२), सर्व राहनार मांडवा तालुका भिवापूर यानी दोन पोलीस व पोलीस पाटील अनुक्रमे, हवालदार सुनिल आदमने, शिपाई पद्माकर विधाते . पो पाटील अमित निळकंठ राऊत यांना जबर धारदार शास्त्राने वार करून मारहान केली. सदर घटना हि रात्री 9:15 च्या सुमारास असुन मारामारी नाटक शामियानाच्या या बाहेर झाली.
सर्व अकरा पुरुष महिला अरोपी विरुद्ध फिर्यादी पो. ह. सुनिल आदमने याच्या तक्रारीवरून 353, 307, 142, 332, 147, 148, 149 भादवि कलाम नूसार गुन्हा नोंदविला असुन उमरेड न्यायालयात हजर करण्यात आले त्यांना चार दिवसाची पोलीस कस्टडी दिली असून. पुढिल तपास बेला ठानेदार अजित कदम करित आहे.
समाजाचे रक्षण करणाऱ्या पोलीसांवर मारहाण करना-यांवर कडक कार्यवाही केली जाईल. - अजित कदम, थानेदार, बेला

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत