हनुमान जन्मोत्सव साजरा, शोभायात्रेने दुमदुमला बेला
हनुमान जन्मोत्सव साजरा, शोभायात्रेने दुमदुमला बेला
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : बेला येथे श्री हनुमान भक्त सेवा मंडळ व मित्रजण यांनी या वर्षी श्री राम भक्त हनुमान जी जन्मोत्सव मोठ्या पर्वावर साजरा करण्यात आला, या पर्वावर श्रीराम भक्त हनुमान याची शोभायात्रा काढण्यात आली. राम जन्म तसेच मागोमाग हनुमान जयंती दिंडी काढण्यात आली.
मंदिर पैलवान बाबा दर्गा समोर असलेले श्री हनुमानजी मंदिरातून या शोभायात्रेला सुरुवात झाली सर्वप्रथम श्री हनुमानजी चे पूजन, आरती, हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले. शोभायात्रेमध्ये मूर्तिकार भैय्याजी गाते यांनी सुंदर कलाकृती करून बनवलेली श्री हनुमान जी ची मूर्ती आकर्षणाचे केंद्र ठरली. जय जय बजरंग बली की जय या जयघोष बेलानगरी दुमदुमली. श्रीरामजीची वानरसेनाचाही खूप सुंदर देखावा या शोभायात्रीची सुंदरता वाढत होता, ट्रॅक्टरच्या ट्रॉली वरील लक्ष वेधून घेणारे श्री बजरंग बली च्या झाक्या आणि रस्त्याच्या दुतर्फा श्री बजरंग बली रॅलीला प्रतिसाद मिळत होता. कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रॅली अतिशय साधेपणाने बेला येथील मुख्य मार्गावरून हळूहळू पुढे जात होती, कोरोना काळामुळे श्री हनुमान जन्मोत्सव व शोभायात्रा निघू शकली नव्हती परंतु आता मात्र अतिशय उत्साह तरुणाईने आणि बालकलाकाराने पुढाकार घेत या शोभयात्रेचे आयोजन केले भक्तिमय वातावरणात शोभायात्रा काढली, ही शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांची प्रचंड गर्दी होती, शोभायात्रेचे चित्रांकन करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या हातात मोबाईल घेऊन चित्रांकन करीत होते,
कार्यक्रमाची सांगता बाजार चौक बेला येथे करण्यात आली तेथे महाप्रसादाचे वाटप करण्यात आले बेला सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन शोभायात्रा यशस्वी करण्याकरिता अंकित तळवेकर, मनोज माहुरकर ,मोहित माहुरकर ,दर्शन तराळे , प्रणीत झाडे , महेंद्र विरुलकर भावेश सातपुते, आकाश साठवणे , यश थुल ,अतुल झाडे दीपक चूटे ,मेघ चिंचुलकर ,सागर रोड़े भूषण मोहितकर, अक्षय डूकरे मोसिम पठान, सुमित डांडवे ,सुजल नागोसे ,ओम नागोसे ,ओम कलसकर ,वेदांत नागोसे, विवेक तायवाडे, गणेश डुकरे व कार्यक्रमची नियोजन प्रशांत नागोसे , कुणाल गवळी, कैलाश साठवणे ,महेंद्र तेलरांधे ,नरेश कलसकर, जीतु जैन ,रवि मते केले तर रॅलीला उत्तम रित्या यशस्वी करण्याकरता तंटामुक्ती अध्यक्ष ज्योती देशमुख , प.स.सदस्य पुष्कर डांगरे ,राजेश लोहकरे , ग्रा, सदस्य अभिनव गोळघाटे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चिपडा कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम बेला ठाणेदार अजित कदम यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत