Breaking News

महिलानो एकत्रित या क्लस्टर च्या माध्यमातून रोजगार उभा करू! :आमदार राजू पारवे

 महिलानो एकत्रित या क्लस्टर च्या माध्यमातून रोजगार उभा करू! :आमदार राजू पारवे

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : बेला सर्कलचे उमरेड पंचायत समिती सदस्य तथा गटनेता पुष्कर डांगरे यांनी आयोजित महिला रोजगार मार्गदर्शन कार्यशाला लोकार्पण व सत्कार समारंभ आजे आयोजन केले होते. यात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरेड विधानसभा चे आमदार राजू पारवे प्रमुख उपस्थिति गीतांजलि नागभिडकर सभापति प. स. उमरेड, सुरेश लेंडे उपसभापति प. स. उमरेड वंदना बालपांडे सदस्य जि. प. नागपुर पुष्कर डांगरे गटनेता प. स. उमरेड जयश्री देशमुख, प्रियंका लोखंडे, दादाराव मांडसकर प.स.उमरेड, अरुण बालपांडे सरपंच बेला सुप्रिया बावणकुळे उद्योग उपसंचालक नागपुर विभाग नागपुर तथा महा व्यवस्थापक जिला उद्योग केंद्र वर्धा नितेश माने गट विकास अधिकारी प.स. उमरेड ,शेखर गजभिये जि. अभियान व्यवस्थापक नागपुर, नागपुरे आर. सेटी नागपुर, उपसरपंच प्रशांत लांबट, विनोद राऊत उमेद अभियान वेवस्थापक उमरेड,सचिव ग्राम पंचायत बेला प्रदीप वाभिटकर ,माधुरी देशमुख, मनीषा लोहकरें यांची उपस्थिती होती.

 बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार निर्माण करता यावा यासाठी शासनाच्या विविध योजना ंची माहिती मिळावी हेच उद्दिष्ट ठेवून महिला रोजगार मार्गदर्शन व कार्यशाळा तथा शिलाई मशीन लोकार्पण तसेच विविध क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या 71 महिलांचा सत्कार समारंभ माऊली मंगल कार्यालय येथे हजारो महिलांच्या उपस्थित पार पडला. 

 प्रथमच बेला येथे पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे यांनी बचत गटातील महिलांना आर्थिक सक्षम होण्यासाठी सूर्योदयप्रभाग संघाला दहा शिलाई मशीन दिल्या. महिलांनी एकत्रित येऊन टेक्सटाइल उद्योग उभारावा त्यासाठी सर्वतोपरि मदत करण्याची व बेला बस स्थानकाला 20 लक्ष निधि देण्याची घोषणा आमदार राजू पारवे यांनी केली. तसेच महिलांना एकत्रित येऊन काम करता यावे त्यासाठी दोन बचत गट भवन बांधून देण्याची घोषणा केली हे बचत गट भवन किंवा ग्राम संघ कार्यालय ग्रामपंचायत ची नसून बचत गटातल्या महिलांची आहे.

 महिलांनी निर्भीडपणे उद्योग चालू करावी यासाठी तुमचा बनवलेला मालं कसा विकावा यासाठी येणाऱ्या अडचणी मी दूर करेल असे आमदारानी आपल्या बोलण्यातून व्यक्त केले. असा भव्य दिव्य महिला बचत गटाचा कार्यक्रम प्रथमच बेल्या मध्ये घडत आहे अशी स्तुती ही केली. सुप्रिया बावनकुळे यांनी महिला क्लस्टर कसे तयार करायचे यांचे मार्गदर्शन केले. शासनाच्या अनेक योजना आहे त्याचा लाभ तुम्ही स्वतः करू घेऊ शकता या क्लस्टर द्वारे अडीचशे महिला एकत्रित काम करू शकते. जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभिये यांनी प्रभाग संघ ग्राम संघ यांना येणारा निधी हा उद्योग उभारता यावा यासाठी दिलेला असतो, महिलांनी स्वतःच्या पायावर उभ्या व्हाव्यात यासाठी महिलांना अतिशय कमी टक्के व्याजदर व लोन उपलब्ध केलेले जाते याबद्दलची माहिती दिली. नागपुरे आर सेटी नागपुर यानी विविध 22 योजनांची माहिती दिली.

सत्कार समारंभात कामगार महिला ते कोरोना काळात केलेली सेवा आशा वर्कर बेला प्रा.आरोग्य केन्द्राच्या महिला परिचारिका, महिला होमगार्ड, महिला सरपंच, महिला पोलीस व पोलिस पाटील तसेच सूर्योदय प्रभाग संघ व 14 ग्राम संघाच्या महिलांचा सत्कार केला गेला. व शेवटी लकी ड्रॉ मध्ये पाच महिला पैठणीच्या मानकरी झाल्या व दहा महिला ना गिफ्ट मिळाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिति उमरेड के गटनेता पुष्कर डांगरे यानी केले व आभार सुवर्णा डांगरे यांनी मानले. तर सर्व सीआरपी व ग्राम संघातील महिलांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत