Breaking News

बेल्यात डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीला सर्वधर्मसमभावाचे दर्शन

बेल्यात डॉ. भीमराव आंबेडकर जयंतीला सर्वधर्मसमभावाचे दर्शन

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : येथील पंचशील बुद्ध विहारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला विविध झाक्यांनी सर्वधर्मसमभावाचे दर्शन झाले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर रमाई चे पात्र नंदू ढोबळे व त्यांच्या पत्नीने केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे टेंगरे दाम्पत्याने केले. गौतम बुद्धाचे लेहन्स लोखंडे यांनी उत्कृष्ट अभिनय केला. भीमा कोरेगाव हा विजयस्तंभ सुद्धा प्रेक्षकांची मने आकर्षित करत होते. सोबतच बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. अब्दुल कलाम यांच्या तैल चित्राने सुद्धा सर्वधर्मसमभावाचा एकोपा दिसून आला. युवक व महिलाने या कार्यक्रमाची चोख व्यवस्था सांभाळली 

लोकजीवन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रबोधन सभा घेऊन उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनिल मुलेवार होते. उपप्राचार्य मिलिंद साव,प्रा.नितिन पुरी व प्रा मोहन नगराळे मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले . जयंतीच्या निमित्ताने संस्थेच्या अध्यक्ष वर्षा बाभुळकर,सचिव सुबोध देशमुख , उपाध्यक्ष बुलारामजी तळवेकर, सर्व प्राध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. वैष्णवी झिंझुर्डे, चैतन्य कादवे या विद्यार्थ्यांनी भाषणे दिली .

सुप्रिया कमोने, प्रगती लोहकरे, नीलिमा मेंघरे, अरविंद भडे,उपमुख्याध्यापक मिलिंद साव यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. राज्यघटना तयार झाली नसती, तर सत्ता मिळाली नसती व आपल्याला पुन्हा पारतंत्र्यात जायला उशिर लागला नसता. असे प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले. लक्ष्मण खोडके यांनी डॉ. आंबेडकर यांचे चित्र रेखाटणे व विचार असा विद्यार्थ्यांचा प्रकल्प राबवला. संचालन श्रद्धा साळवे यांनी केले . प्रा मोहन नगराळे यांनी उपस्थितांचे आभार. संविधान वाचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत