Breaking News

नगर - पुणे महामार्गावरील म्हसणे टोलनाका कायम स्वरुपी बंद करा ~ मनसे नेते अविनाश पवार

 नगर - पुणे महामार्गावरील म्हसणे टोलनाका कायम स्वरुपी बंद करा ~ मनसे नेते अविनाश पवार

अन्यथा १५ दिवसानंतर जिल्हाअधिकारी यांच्या दालणात कुठलीही पूर्वसुचना न देता बसणार~पवार

सुप्यासह नगर- पुणे महामार्गावरील अर्धवट व निकृष्ठ दर्जाच्या कामांच्या प्रश्नावर मनसेचा ईशारा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पारनेर : अहमदनगर-पुणे महामार्ग अपघात-अतिक्रमण, वाहतूक कोंडी मुक्त करावा या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अनेक वेळा महामार्गावरील असुवीधा विशई आवाज उठऊन सार्वजनिक बांधकाम सह,संबंधित टोल कंपनी यांना आनदोंनाचे इशारे देण्यात आले. तत्कालीन पोलिस निरीक्षक नितीन कुमार गोकावे साहेबांच्या मध्यस्थीने सुपा पोलिस स्टेशन येथे संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाची बैठक होऊन सुद्धा प्रांतअधिकारी सह तहसीलदार यांच्या सोबत चर्चा बैठक पे बैठक अतिक्रमण धारकांना नोटीस काढुन सुद्धा याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांचे काही आर्थिक संबंध आहेत की काय हे न उलगडलेले कोडे आहे या सर्व गोष्टी चा संबंधित विभागाकडे पाठपुरावा करुन सुद्धा संबंधित अधिकारी हे गांभीर्याने न घेता निवेदनाला केराची टोपली दाखवणार असतील तर हे दुर्दैवी आहे.

 या नगर-पुणे महामार्गावर १३वर्ष टोलवसुली करुन बंधनकारक मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अपयशी ठरलेला चेतक एंटर प्रायजेस म्हसणे फाटा टोलनाका अता कोणत्याही प्रकारची सवलत न देता त्वरित महसुल प्रशासनाने बंद ( सिल ) करावा कारण निकृष्ठ दर्जाच्या कामामुळे सतत अपघात होऊन अनेक निरपराध कुटुंब उध्वस्त होत आहेत तर अनेक नागरिकांना अपंगत्व प्राप्त झाले आहे या रोडवर निरपराध नागरिकांना आपला जिव गमवावा लागला आहे, लागत आहे. महामार्गावर रक्त सांडते आहे.

  अनेक वेळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पञव्यव्हार करुन पण सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व चेतक एंटर प्रायजेस म्हसणे फाटा टोलनाका अधिकारी महामार्गावर रक्त सांडलं जात असताना सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे १५ दिवसात याला जिम्मेदार असणार्या कंपनी व्यवस्था पणावर गुन्हा दाखल होऊन प्रत्यक्ष कार्यवाही झाली नाही तर कोणतीही पुर्व सुचना न देता शेवटचा पर्याय जो पर्यंत हा टोलनाका कायम स्वरुपी बंद होत नाही तोपर्यंत जिल्हा अधिकारी अहमदनगर यांच्या दालनात बसणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माथाडी कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अविनाश पवार यांनी तहसीलदार पारनेर तसेच पोलिस प्रशासनाला दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत