Breaking News

बेला येथे समर्थ सद्गुरू बापुजी महाराजांची पुण्यतिथी साजरी

 बेला येथे समर्थ सद्गुरू बापुजी महाराजांची पुण्यतिथी साजरी

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : स्थानिक बेला येथे वार्ड क्र. १ मध्ये अंदाजे ३५० वर्षांपूर्वी वाकोडीचे समर्थ सद्गुरु गोंदबाजी महाराज यांचे चिरंजीव श्री समर्थ सद्गुरु बापुजी महाराज हे बेला येथे अनुयांनाच्या भेटीस यायचे.त्यावेळी वरुथीनी एकादशी ला बेल्याला आले असता अनुयांना एक साक्षात्कार देवून देह ठेवण्याची विनंती करून बेला येथे वरुथीनीला सदेह समाधी घेवून त्यावेळी मोठा उत्साहात समाधी सोहळा पार पडला.तेव्हा पासून (३५० वर्षांपूर्वीपासून) त्यांचा पुण्यतिथी सोहळा पार पाडल्या जातो.

दरवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री संत बापुजी महाराज यांची पुण्यतिथी दिनांक १६ एप्रिल २३ ला पुण्यतिथी सोहळा आणि गुरुपुजा तसेच रात्री ९ वाजता ह.भ.प. तुळशीदास महाराज पराते यांचे कीर्तन करण्यात आले.दुसऱ्यादिवशी सायंकाळी भव्य महप्रासादाचे आयोजन करून तिसऱ्या दिवशी दिनांक १८ एप्रिल २३ ह. भ. प. तुळशीदास पराते ह्यांच्या हस्ते गोपालकाल्याचे कीर्तन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मठाचे कार्यकारी अनुक्रमे उज्वल हेडाऊ, प्रेम लामपुसे, आदर्श बेंडे, मनीष बारापात्रे, प्रशांत बारापात्रे, भास्कर हेडाऊ यशवंत बेंडे, यशवंत लामपुसे, गोविंद कोहाड, अरुण हेडाऊ, यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत