बुधवारी पेठ येथील शहीद जवान मनोज कटनकर यांना वाहण्यात आली श्रद्धाजंली
बुधवारी पेठ येथील शहीद जवान मनोज कटनकर यांना वाहण्यात आली श्रद्धाजंली
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, विनोद कुमार डांगरे, बेला : बुधवारी पेठ येथील शहीद जवान मनोज नथ्थुजी कटनकर यांच्या १८ व्या शहिददिन निमित्य दि. १६ एप्रिल ला श्रध्देय राजीव दिक्षित विचार मंचच्या सदस्यांनी भेट देत श्रद्धजंली वाहली. यावेळी कटनकर परिवार उपस्थित होते.
बुधवारी पेठ येथिल रहिवासी असलेले मनोज कटनकर हे २००४ मध्ये सैन्यात कर्तव्यावर असतांना शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य स्मारक उभारण्यात आले. याच दिवसा चे औचित्य साधून श्रद्धेय राजीव दिक्षित विचार मंच चे कार्याध्यक्ष विनोद कुमार डांगरे, अशोक नवले, राजेश जाभूळे यांनी मनोज कटनकर यांच्या स्मारक जवळ पुष्पगुच्छ वाहून श्रद्धांजली अपर्ण केली.
यावेळी विचार मंच सचिव दिनेश गोळघाटे, सहसचिव नागेश भिवनकर किशोर बानकर, सुनील गावडे, चंद्रमणी टेंभुर्णे, दत्तु जिभकाटे, अमित पोंगडे तसेच विरमाता गंगाबाई कटनकर, विनोद कटनकर, हरिओम कटनकर, राजेश बांदरे शंकर धोटे, माधुरी कटनकर, रीना कटनकर परिवार उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत