अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांच्या सावली पोलिसांनी आवळल्या मुसक्या
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, योगेश रामटेके, सावली : दिनांक 09/05/23 रोजी चे मध्यरात्री दरम्यान मुल ते गडचिरोली मार्गावरून चारचाकी वाहनाने अवैध दारू वाहतूक होणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय खबरेवरून पोलिस स्टेशन सावली समोर तात्काळ नाकाबंदी केली असता फोर्ड EcoSport MH 27AR 9531 मध्ये रॉकेट संत्रा देशी दारू कंपनी चे 44 बॉक्स मिळून आले.
मिळून आलेली नमूद क्रमांकाची कार किंमत 8 लाख रु व देशी दारू 44 बॉक्स किंमत 2 लाख 14 हजार रुपये असा एकूण 10 लाख 14 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तीन आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्ाअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई मा. पोलिस अधीक्षक श्री रवींद्र सिंग परदेशी साहेब अप्पर पोलिस अधीक्षक रिना जन बंधू व उपविभागीय पोलिस अधिकारी श्री मल्लिकार्जुन इंगळे यांचे मार्गद्शनाखाली व ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पो उप नी मडावी, स. फौ. खरकाते, पो का. धीरज, निलेश महिला अंमलदार विशाखा यांनी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत