Breaking News

नाबार्ड व अंबुजा फाउंडेशन तर्फे कोलाम महिला मेळावा

 नाबार्ड व अंबुजा फाउंडेशन तर्फे कोलाम महिला मेळावा

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : अतिदुर्गम भागातील कोलाम जमात ही सामाजिक,आर्थिक शैक्षणिक विकासापासून कोसो दूर आहे. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी मोठे प्रयत्न केला आहे, त्या अनुषंगाने कोलाम समाजात उत्कृष्ठ काम करण्याऱ्या महिलांचा तसेच बचत गटांचा सत्कार करून त्यांचे मनोगत घेण्यात आले. सोबतच कोलम समाजातील प्रगतशील शेतकरी श्री.झाडू कोडापे आणि श्री आनंदराव कोदापे यांनी कोलामी भाषेतून महिलांचा मार्गदर्शन केले.

 सोबतच अंबुजा सिमेंट फाउंडेशन जिवती लोकेशन मार्फत कुकूटपालन व शेळीपालन व bci प्रकल्प इत्यादी बघून LEDP करिता नवीन प्रस्ताव नाबार्ड मंजूर करून, कोलाम शेतकरी यांना सावकारी पाशातून बाहेर काढण्यासाठी नवीन प्रकल्प मंजूर करण्याची ग्वाही फुलझेले DDM यांनी दिली. यावेळी अंबुजा सिमेंट फाउंडेशन चे जिवती लोकेशन इन्चार्ज दिपक साळवे यांनी आदिवासी महिलांनी शेती पूरक व्यवसाय करण्याचे आवाहन केले. 

त्यासाठी अंबुजा सिमेंट फाउंडेशन सोबत आहे.आम्ही वेळोवेळी प्रशिक्षण देऊन मदत करायला तयार असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थिती जिवती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी रेजिवाड,मंडळ अधिकारी श्रीमती गोडबोले, बबिलवर, तालुका समन्वयक महेश उपरे व सर प्रमोद पानघाटे सर आणि सर्व प्रक्षेत्र अधिकारी जिवती लोकेशन व मेळाव्याला जिवती तालुक्यातील सर्व कोलाम गावातील महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.सूत्र संचालन प्रशांत मोरे तर आभार रमाकांत जंगापल्ले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत