वरोरा येथील व्यापाऱ्याला बँक खात्यातून सोळा लाखाचा ऑनलाईन गंडा
वरोरा येथील व्यापाऱ्याला बँक खात्यातून सोळा लाखाचा ऑनलाईन गंडा
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, खेमचंद नेरकर, वरोरा : येथील साई तुप्ती इलेक्ट्रॉनिक अँड इलेक्ट्रिकल या नावाने येथील व्यापाऱ्यांचे युनियन बँक ऑफ इंडिया च्या वरोरा येथील बँक शाखेत खाते होते. सदर व्यापाऱ्याला बँकेतून बोलत असल्याचे सांगून तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक होत असल्याची बतावणी करून ओटीपी नंबर मागून घेतला. त्या नंतर व्यापाऱ्याला मोबाईल वरती मसेज यायला सुरुवात झाली. चोरट्यांनी ऑनलाइन गंडा देत व्यापाऱ्याचा बँक खात्यातून 16 लाख 81 हजार 999 रुपये शुक्रवार ता 12 जानेवारीला ऑनलाईन कपात झाले.ही रक्कम वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या बँक खात्यात चोरट्यांनी आय एम पी एस, आर टी जी एस ट्रान्सफर च्या माध्यमातून वळती केलेआहे.
वरोरा येथील व्यापारी नरेश शंकर सहारे यांचे युनियन बँक ऑफ इंडिया बँकेतील वरोरा शाखेत साई तृप्ती इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल्स या नावाचे खाते होते . सदर व्यापाऱ्याला ता 1 जानेवारीला युनियन बँकेतून बोलत आहोत असे सांगून तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक होत आहे अशी बतावणी करत व्यापाऱ्याला विश्वासात घेत व्यापाऱ्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी चोरट्यांनी मिळवला .त्यानंतर सदर व्यापाऱ्याला मोबाईल वरती ऑनलाइन मेसेज येत होते. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन खाते ब्लॉक करण्यास सांगितले आणि डेबिट कारही बंद केले.
मात्र व्यापाराला पैशाची गरज असल्याने एक आठवड्यानंतर पुन्हा बँकेत जाऊन सदर खाते सुरू करण्याची बँकेला विनंती केली. त्यानुसार त्यांचे बँक खाते ता 11 जानेवारीला सुरू करण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी सकाळी तारीख 12 जानेवारीला व्यापाऱ्याच्या खात्यातून अर्ध्या तासाच्या कालावधीतच ट्रान्सफर, आय एम पी एस, आरटीजीएसचा वापर करून चोरट्यानी व वेगवेगळ्या खात्यामध्ये रक्कम ट्रान्सफर व्हायला लागली अशी एकूण रक्कम 16 लाख 81 हजार 999 रुपये सदर व्यापाऱ्याच्या खात्यातून चोरट्यांनी पळवली आहे.
सदर व्यापाऱ्याने वरोरा पोलिसात तशा प्रकारची तक्रार दाखल केली आहे वरोरा पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लक्षात घेत अज्ञाता विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत