राजुरा आगारात 22 जुलै ला लालपरीचा 'प्रवासी राजा' राजा दिन.
राजुरा आगारात 22 जुलै ला लालपरीचा 'प्रवासी राजा' राजा दिन.
प्रवाशांना आपल्या समस्या मांडता येणार: विभाग नियंत्रक घेणार दखल
राजुरा :प्रवाशांच्या समस्या, तक्रारी वजा सूचना यांचे स्थानिक पातळीवर जलद गतीने निराकरण होण्याच्या उद्देशाने राजुरा आगारात सोमवारी दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता पासून 'प्रवासी राजा दिन' साजरा करण्यात येणार आहे. १५ जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ होणार आहे. प्रवासी राजादिनी प्रवासी, प्रवासी संघटना, विद्यार्थी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकणार आहेत.
लालपरीने प्रवास करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु, या समस्या कुणापुढे मांडायच्या, याबाबत प्रवाशांना अडचण असते. त्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण होऊ शकत नाही. मात्र, आता राजुरा आगारात 22 जुलै रोजी प्रवासी राजा दिन उपक्रम राबविण्यात येणार आहे. प्रवासी राजादिनी प्रवासी, प्रवासी संघटना, विद्यार्थी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकणार आहेत. या दिवशी एसटीच्या विभाग नियंत्रक राजुरा आगारात येऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना ऐकून घेतील. त्या तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
या दिवशी प्रवासी संघटना, विद्यार्थी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात मांडू शकता. एसटीच्या विभाग नियंत्रक राजुरा आगारात येऊन प्रवाशांच्या समस्या, तक्रारी, सूचना तातडीने सोडविण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणार आहेत.
राकेश बोधे
आगर प्रमुख राजुरा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत