Breaking News

पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू

 पाण्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू 

महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, हक्कानी शेख, जिवती : तालुक्यातील मौजा आंबेझरी (रोडगुडा) येथील दोन युवक सकाळी शेळ्या व मेंढ्या चारण्यासाठी शेतशिवारात गेले असता दुपारच्या वेळी शेळ्या फिरवून आणल्यानंतर विश्रांतीसाठी तलावाकाठी असलेल्या विहिरीच्या बांधावर बसले असता, नकळत तोल गेला आणि एकमेकांना सांभाळण्याच्या प्रयत्नात दोघेही विहिरीत पडले, दोघांनाही पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

निखिल बाबाराव शिंदे वय 22  वर्ष, अब्दुल नवाज शेख,वय 24 वर्ष असे मृत्यू झालेल्या युवकांचीं नावे आहेत सदरील घटना ही दुपारी 1:00 ते 2:00 वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे वृत्त आहे.त्यांच्या मृत्यूने परिसरातील रोडगुडा(आंबेझरी),आंबेझरी, हटकरगुडा,या गावामध्ये शोककळा पसरली आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत