Breaking News

नायवाडा,धाबा,सोरेकसा येथिल शेतकरींना हक्काचे शेत जमीन पट्टे द्या. - सुनिल राठोड

 नायवाडा,धाबा,सोरेकसा येथिल शेतकरींना हक्काचे शेत जमीन पट्टे द्या. - सुनिल राठोड 

 सुनिल राठोड यांचे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना निवेदना मार्फत ग्रामवासीयांना शेत जमीन पट्टे देण्याची केली मागणी

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : अतीदुर्गम भाग म्हणुन ओळखला जाणारा जिवती तालुक्यातील सोरेकसा ग्रामपंचायत येथे दि.16 डिसेंबर ला ग्रामसभा पारपडली या ग्रामसभेत सोरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत नायवाडा,धाबा व सोरेकसा येथिल शेतकरी हा 1950 पासुन शेतीची मशागत करुन परीवाराचं पालन पोषण करत आहे तरी त्यांना हक्काचे शेत जमीन पट्टे नाहित व शेत जमीन पट्टे नसल्याने या शेतकत्यांना कुठल्याही प्रकारे शासकीय योजनेचा लाभ घेता येत नाही.

 साद देशाच रहिवासी असल्याचे इतक्या मोठ्या प्रमाणात कार्ड काढले गेलेले आहेत आणी आम्ही शेतकरी कष्टकरी असुन सुद्धा आमची शेतकरी म्हणुन ओळख नाही म्हणून प्रथमच सोरेकसा ग्रामपंचायत नी शेत जमीन पट्टे मिळण्यासाठी ठराव सर्वांनुमते मंजुर केला आहे.

 या सभेचे अध्यक्ष म्हणुन सोरेकसा ग्रामपंचायत सरपंच सागर कोटनाके तर ग्रा.प.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता सुनिल भाऊ राठोड बाजीराव मडावी निलाबाई जाधव कल्पना राठोड यमुना कोटनाके ग्रामपंचायत सचिव रवि बोरकर रोजगार सेवक देविदास राठोड संतोष पवार प्रकास राठोड रमेश राठोड तटामुक्ती अध्यक्ष भोजी पाटील जालीम पाटील अगंणवाडी सेविका कविता राठोड व ग्रामवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या बैठकीत या मागनीची तत्काल दखल घेऊन सोरेकसा ग्रामपंचायत अंतर्गत नायवाडा, धाबा व सोरेकसा येथिल शेतकरींना हक्काचे शेत जमीन पट्टे देण्याची ग्रा.प.सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ता सुनिल भाऊ राठोड यांनी जिलाधिकारी साहेब चंद्रपुर यांना निवेदन केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत