अवैध धंदे जोमात टेकामांडवा ठाणेदार हप्ता घेऊन कोमात ?
जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देतील का?
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, शेख हक्कानी, जिवती : चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकाला जिवती तालुका तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे याच तालुक्यातील टेकामांडवा पोलीस स्टेशन हद्दीत खुलेआम अवैध दारू, अवैध जुगार, गांजा इतर अवैध धंदे जोमात सुरू असून या धंद्याकडे टेकामांडवा पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांचे दुर्लक्ष झाले असून या मागचे कारण ही तसेच आहे. या अवैध धंद्यावाल्याकडून खूप मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन हप्त्याच्या स्वरूपात होत असल्याची खुलेआम चर्चा सुरू आहे.
भारी परीसरातुन अवैध रित्या वाळू उपसा करून ट्रॅक्टराच्या सहाय्याने टेकामांडवा मार्गाने वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून व तसेच तेलंगाना राज्याची सीमा लागून असल्यामुळे त्या राज्यातून वाळूची मोठ्या प्रमाणात टेकामांडवा मार्गे वाहतूक केली जात असल्याचे बोलले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात क्राईम होऊ नये म्हणून चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब अतोनात प्रयत्न करीत असून त्यांच्या प्रयत्नाला मोडीत काढण्याचे काम टेकामांडवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार करत असल्याची बाब समोर आली आहे.
या अवैध धंद्यामुळे क्राईम होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. टेकामांडवा परिसरातील गावाच्या अनेकांचे संसार उध्वस्त होत असून व तसेच शाळकरी मुलंही दारूच्या आहारी गेल्याची चर्चा सुशिक्षित नागरिकाकडून ऐकण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा कापसाचा हंगाम सुरू असून शेतकरी बांधव कापूस विकण्यासाठी पिकअप आईचर भरून कापूस विकण्यासाठी जात असल्याने त्या शेतकरी बांधवांच्या कापूस भरलेल्या गाड्या अडवून त्यांच्याकडून अवैधरित्या वसुली केली जात असल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना मागणी आहे की टेकामांडवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व संबंधित ठाण्याच्या परिसरातील अवैध धंदे बंद करावे अशी मागणी परिसरातील सुशिक्षित नागरिकांनी केली आहे.

.jpeg)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत