सिर्सि येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
सिर्सि येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी, बेला : सिर्सी येथील रमाई बुद्ध विहारात बौध्द पंचकमेटी, जयभीम एकता मंडळ व भारतीय दलित पँथर यांच्या संयुक्त विद्यमानाने रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच वंदनाताई बुटे होत्या. यावेळी जि.प.सदस्य मिलिंद सुटे, उपसरपंच अतुल नारनवरे,प्रदीप पाटील व सावित्रीबाई कॉन्व्हेंटच्या संगीता गजभिये यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
त्यागमुर्ती माता रमाई बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती प्रित्यर्थ बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाल्यार्पण करून त्यांना उपस्थितांनी अभिवादन केले. प्रदीप पाटील यांनी अल्पोपोहार वितरण केले. यशस्वीतेसाठी पँथर यशवंत अंबागडे, रुपेंद्र आंबुलकर, संजय मेंढे, उमेश कांबळे, संघर्ष अंबागडे, गोलू सुटे, मंगेश पाटील, प्रशांत भगत, कपिल मेंढे, सविन गजभिये, उत्तम जुनघरे, राजु सुटे, बालकदास सुटे, प्रभाकर मेंढे, रोहित सोनेकर, अशोक जुनघरे, अंगणवाडी सेविका वनमाला कांबळे, सत्यभामा कांबळे, जोत्सना मेंढे, चैताली तामगाडगे, वंदना अंबागडे, धारा हाडके, समता अंबागडे, पिंकी सुटे, सुनंदा सुटे, शोभा सुटे, सोनू मेंढे आदी बौध्द उपासक, उपसिका यांनी सहकार्य केले.
बातमी संकलन : दिनेश गोळघाटे, बेला





कोणत्याही टिप्पण्या नाहीत