सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूरचे दुर्लक्ष
मराई पाटण ते भारी रस्त्याची दुर्दशा
सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूरचे दुर्लक्ष
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, हकानी शेख, जिवती : तालुक्यातील अनेक रस्त्याची दुर्दशा झाली आहे. मराई पाटण ते भारी पर्यंत रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून श्री जय गिरणारी कन्स्ट्रक्शन जेबी वरोरा या कंपनीने दोन वर्ष अगोदर रस्त्याचे काम पूर्ण केले. अंदाजपत्रकानुसार काम झालेला नसल्यामुळे रस्ता पूर्णपणे उकडलेला असल्याने रस्त्यावरची गिट्टी पूर्णपणे पसरली आहे. त्यामुळे निकृष्ट दर्जाचा काम झालेला दिसून येत आहे.
ज्यावेळी कॉन्ट्रॅक्टदार काम घेतो करारनामा करतो त्यावेळी काम करण्यासाठी वर्क ऑर्डर कॉफी कंत्राटदाराला मिळते त्यात उल्लेख असतो की पाच वर्ष देखभाल दुरुस्ती संबंधित कंत्राटदाराकडे राहणार व त्या कंत्राटदाराला पाच वर्षात रस्त्याची दुरुस्ती करून द्यावे लागते. दोन वर्षात रस्त्याची पार वाट लागली असून याकडे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर याचे दुर्लक्ष असल्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही.
या रस्त्यात खूप मोठा भ्रष्टाचार झाले असल्याची चर्चा तालुक्यातील जनता करीत आहे. संबंधित बांधकाम विभाग व कंत्रदारांच्या हात मिळूनीमुळे बोगस, निकृष्ट दर्जाचा काम झाल्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दररोज अपघाताला आमंत्रण द्यावे लागत आहे.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व तसेच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिवती तालुक्यात रस्त्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले परंतु सर्वच रस्ते शेवटची घटका मोजत आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहन चालकांना मणक्याच्या त्रास दम्याच्या त्रास होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत