पाचगांव शाखेची भाजयुमो कार्यकारणी जाहीर
तालुकाध्यक्ष अजय राठोड यांचेकडून घोषणा.
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, राजुरा : भारतीय जनता युवा मोर्चा राजुरा तालुकाचे अध्यक्ष श्री. अजय राठोड यांनी विधानसभेचे लोकप्रिय आमदार देवरावदादा भोंगळे यांच्या सुचनेनुसार तसेच भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते व तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे यांच्या मार्गदर्शनात आज राजुरा ग्रामीण मंडळातील पाचगांव या गाव शाखेच्या भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारिणीची घोषणा केली आहे.
त्यानुसार पाचगांव शाखेच्या भाजयुमो अध्यक्ष पदी अशोक जंभुलवार महामंत्री म्हणून संजय भसाकत्रे, विशाल भेंडे, उदयकिरण नूलावार हे तर उपाध्यक्ष पदी गुलाब कन्नाके, मारोती जाभोर, राकेश बोबडे, सोनेराव सिडाम व अंकित पुप्पलवार यांची तर सचिव पदी विजय भोयर, विपुल वांढरे, राजकुमार पेटकर, अक्षय बावणे, गणेश कुरवटकर यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
शाखेचे कार्यकारणी सदस्य म्हणून उमेश झाडे, सुनील मोरे, स्वप्नील चापले, समीर मडावी, सुनील मडावी, प्रदीप मडावी, विजय कोटनाके, गणेश मडावी, संतोष खाडे, वस्ताद शेडमाके, संपत आळे, सचिन पिंगे, आकाश बोबडे,सचिन रासपल्ले यांच्या नावांचा समावेश आहे.
या नवनियुक्त कार्यकारणीचे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अशोकजी उईके, माजी पालकमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराजभैय्या अहीर, आमदार देवरावदादा भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेशजी देवकते, तालुकाध्यक्ष सुनील उरकुडे, तालुका महामंत्री वामन तुराणकर, महामंत्री दिलीप गिरसावळे, महामंत्री बाळनाथ वडस्कर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा मंजुषा अनमुलवार, माजी पं.स. सदस्या सुनंदा डोंगे, युवा मोर्चाचे महामंत्री सचिन बल्की, आकाश गंधारे, राहुल सपाट, विकास गौरकार आदींनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत