Breaking News

भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी योग भवन निर्माण करू - आमदार देवराव भोंगळे

जिल्हास्तरीय सह योगशिक्षक प्रशिक्षणाचे उद्घाटन. महिनाभर चालणार शिबिर.

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : धकाधकीच्या व व्यस्त जीवनात निरोगी राहण्यासाठी व मनशुद्धीसाठी नियमित योगा करणे हे अत्यंत गरजेचे आहे. मागील पंचवीस वर्षापासून राजुरा शहरात पतंजली योग समितीच्या वतीने योगाभ्यास व योग प्रचार सुरू आहे. मानवी कल्याणासाठी व निरोगी जीवनासाठी पतंजली समिती कार्य करीत आहे. भारतीय संस्कृतीचा वारसा नवीन पिढी पर्यंत पोहचविण्याचे कार्य योग साधक करीत आहेत. योगसाधकाना नियमित योगाभ्यास  करण्यासाठी भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासण्यासाठी शहरात सुसज्ज योग भवन उभे राहिल असे आश्वासन आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा येथे दिले.

पतंजलि योगपीठ, हरिद्वार द्वारे, पतंजलि योग समिती, महिला पतंजलि योग समिती, भारत स्वाभिमान न्यास किसान सेवा समिती आणि युवा-युवती पतंजलि योग समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरा येथे जिल्हा स्तरिय सह योगशिक्षक प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन  आमदार देवराव भोंगळे  यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते. 

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप साहेब होते तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाशजी जाधव, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष एडवोकेट अरूण धोटे, जिल्हा प्रभारी पतंजली योग समितीचे मा. अशोकजी सांगिडवार, जिल्हा संघटन मंत्री मा.शरदजी व्यास, जिल्हा मीडिया प्रभारी श्री प्रकाशजी राठोड, जिल्हा सह प्रभारी श्री अशोकजी पूर्णये,सौ. कल्पना लूनावत,

अखिल भारतीय मजदूर संघाचे महामंत्री सुधीरजी घुरडे, रामपूर ग्रामपंचायत सरपंच सौ . निकिताताई  झाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य तेजस्विनीताई कावळे, जिल्हा सह संघटन मंत्री पुंडलिक उराडे यांची उपस्थिती होती. ग्रामपंचायत रामपूर हद्दीमध्ये योग भवन होण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल सरपंच सौ निकिताताई झाडे यांचा पतंजली योग समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच आमदार देवराव भोंगळे यांचाही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना माजी आमदार एडवोकेट वामनराव चटप यांनी शारीरिक मानसिक स्वास्थ्यासाठी  योगाभ्यासाचे महत्त्व विशद केले. भारतीय संस्कृतीचे मूल्य सांगितले. निरोगी जीवनासोबत शीलवान, चरित्रवान   नागरिक घडण्यासाठी रम , रमा आणि रमी यापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

 जिल्हास्तरिय सह योगशिक्षक प्रशिक्षण शिबीर दिनांक 28 मार्च पर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये आजारानुसार योग, प्राणायम, प्रशिक्षण व तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक उपचार व मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सह संघटन मंत्री पुंडलिक उराडे यांनी केले संचालन प्राध्यापक दत्तात्रय मोरे व आनंद चलाख यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष हरिभाऊ डोरलीकर यांनी मांडले. या प्रसंगी मंगल प्रभात ग्रुपने अतिशय सुंदर योगा नृत्य करून उपस्थितांची मने जिंकली.

आयोजनासाठी तालुका प्रभारी मुखरु सेलोटे, प्रभाकर चेन्ने, अरुण जमदाडे, शिवकरण खदाव, नंदूरकर,सौ.भावनाताई भोयर,सौ सोनलताई चिडे, कल्पनाताई सुरडकर, ,सौ. गणपती चौधरी,  श्रीमती मेघा धोटे, सौ वनिता उराडे, श्रीमती चंद्रकला खंडाळे, सौ रमा येतलावार,सौ सुरेखा उराडे,श्रीमती उज्वला जयपूरकर, सौ मंगला डोरलिकर, सौ संतोषी खदाव,सौ सुनिता जमदाडे, सौ रागिणी राजुरकर,श्री रवी येगींनवार, सौ येरावर, समस्त योग साधक व योगसाधिका यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत