गडचांदूर ते परमडोली नवीन रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार, संबंधित बांधकाम विभागाचे झोपेचे सोंग..!
निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी होणार का ?
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, हक्कानी शेख, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील नवीन रस्त्याचे बांधकामत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रमाणपत्र रस्त्याचे खड्ड्याने दिले आहे. निकृष्ट दर्जाचे कामामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे व रस्त्यावर लांबलचक भेगा पडल्याचे विदारक चित्र दिसत आहे. गडचांदूर ते पाटण, शेणगाव, जिवती, परमडोली या मुख्य मार्गाच्या बांधकामाचा निकृष्ट दर्जा आणि अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावर डांबरीकरण उकळून गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. मोठ मोठे लांबलचक खड्डेच खड्डे पडले आहे. आणि मोठ मोठे भेगा आल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतले असल्याचे चर्चा जोमात सुरू आहे. ठेकेदाराला वाचवण्यासाठी संबंधित बांधकाम विभाग प्रयत्न करत आहे का असेही प्रश्न जनतेमध्ये बोलले जात आहे. कारण या रस्त्याची प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी होऊऊ आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून अनेक वेळा निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे बातम्या प्रकाशित करण्यात आले तरी पण संबंधित बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे हे प्रकरण गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे.
गावातून जाणाऱ्या मार्गाचे चिखली, पाटण, आंबेझरी, शेणगांव, जिवती व वणी (बु.) सिमेंट काँक्रिट रोडचे काम झाले असून या काँक्रीट रस्त्यालाही भेगा पडले असून सिमेंट काँक्रेट रोडला लागून सिमेंट काँक्रीट नाल्या बनवण्यात आले त्या नाल्यात पावसाळ्याच्या रस्त्यावरचा पाणी जाण्यासाठी जागा सोडण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावरच्या पाणी ओवर फुलवून रस्त्यालगतच्या घरात शिरत असते. शेणगांव येथे सिमेंट काँक्रेट रस्त्याच्या बाजूला डांबरीकरण करण्यात आले नाही. आणि काही ठिकाणी साईड भरण करण्यात आले नसल्यामुळे गावातही दररोजच लहान मोठे अपघात होत आहे. शेणगांव येथील सिमेंट काँक्रीटला लागून तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे. हा मुख्य मार्गाचे सुरुवातीपासूनच निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने रस्त्याची दुर्दशा होत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, रस्त्याच्या समतोलाचा अभाव जाणवतो यामुळे दररोज अपघात होत आहे .परिणामी पावसाळ्यापर्यंत रस्त्यावरच्या डांबरीकरणच दिसणार नाही पूर्ण जागोजागी खड्डेच खड्डे गिट्टी रस्त्यावर पसरणार अशी शक्यता आहे.
कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा फटका वाहन चालकांना व तालुक्यातील जनतेला बसत आहे. मात्र रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यास परिस्थिती वेगळीच दिसते. डांबरीकरणचे, सिमेंट काँक्रिटचे काम आणि नाल्यांचे बांधकाम इतके हलक्या दर्जाचे आहे की, ते काम पूर्ण होण्यापूर्वीच खराब झाले आहे. बांधकाम विभागाकडे स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. नागरिकांच्या मते संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात मिलीभगत असून, यामुळेच कामाच्या गुणवत्तेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. अपूर्ण आणि निकृष्ट कामाची सखोल चौकशी केली जावी. कंत्राटदारावर कठोर कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकावे. रस्त्याच्या कामाची गुणवत्तापूर्ण पुनर्बांधणी तात्काळ सुरू करावी. निकृष्ट दर्जाच्या रस्त्यामुळे अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. जबाबदार कोण ?
या रस्त्यावर अनेक अपघात झाले असल्याची नोंद स्थानिकांनी दिली आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होतो. रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे तालुक्यातील जनतेने प्रशासनाला दोष दिला आहे. याप्रकरणी, संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदारावर कारवाई करणे आणि अपूर्ण काम पूर्ण करणे गरजेचे आहे. निकृष्ट दर्जाचे काम स्वीकारल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवरही चौकशी होण्याची मागणी केली जात आहे. त्वरित गडचांदूर ते परमडोली पर्यंत डांबरीकरण व सिमेंट काँक्रीट रस्त्याची गुणवत्ता तपासून दोष दूर करणे. गावातील रस्त्याचे पावसाळ्याचे पाण्याचा योग्य निचरा सुनिश्चित करणे. दोषी अधिकाऱ्यांवर व कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील जनतेने केली आहे.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत