गरोदर मातेसाठी रुग्णवाहीका चालक ठरले देवदुत
गरोदर मातेसाठी रुग्णवाहीका चालक ठरले देवदुत
महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर : अती दुर्गम भाग म्हणुन ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेणगाव येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अचानक हायरिस्क गरोदर माता सकाळी 9.30 च्या दरम्यान आले असताना पेशंट ची स्थिती नाजुक असल्याचे लक्षात घेऊन बि.पी.तपासनी केली असता 200 च्या वर असल्याची खात्री होताच पेशंटला झटके येण्यास सुरुवात झाली व पेशंट बेसुद्ध अवस्थेत डॉक्टरांनी तत्काल प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथिल 102 या रुग्णवाहीकेस संपर्क साधुन डॉक्टर यांनी ग्रामिण रुग्णालय गडचांदुर येथे रेफर केले.
त्या वेळी रुग्णवाहीका चालक रामेश्वर श्रिमंत शेळके या चालकांनी विलंब न करता पेंशट ची कंडिशन खुप जास्तीचीच खालवली असल्याचे पाहुण प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव येथुन ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे आपल्या जिवाची पर्वा न करता बुलेट ट्रेन च्या स्पिडने अवघ्या 15 मिनीटाच्या आत पेशंट ला पोहचत केले व पेशंटला योग्य तो उपचार मिळाल्याने पेशंट ही गरोदर माता सुखरुप बाळाला जन्म देऊन रुग्णवाहीका चालक रामेश्वर शेळके यांचे व्यक्तिक आभार मानले व माझ्यासाठी तुम्ही एक देवदुतच असाव असे संभोदले वेळेच्या आत रुग्णाला पोहचत करुन एका गरोदर मातेचा प्राण वाचवणारे रुग्णवाहीका चालक रामेश्वर शेळके यांचे तालुक्यातुन सर्वोतरी कौतुक केला जातो आहे खरोखरच आपल्या कर्तृत्वाच पालन करुन एका गरोदर मातेचे प्राण वाचवणारे रुग्णवाहीका चालक देवदुतच ठरले.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत