विसापूर मधील महापुरुषांचे पुतळे व परिसर स्वच्छतेला आज 18 jun 2025 पासून सुरुवात
विसापूर मधील महापुरुषांचे पुतळे व परिसर स्वच्छतेला आज 18 jun 2025 पासून सुरुवात
श्री. संदीप भाऊ पोडे यांच्या पाठपुराव्याला यश तर ग्रामपंचायत कार्यालय चे आभार
महा घडामोडी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कमलेश खोब्रागडे चंद्रपूर:विसापूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या महापुरुषांच्या परिसराची दररोज साफसफाई करण्यात यावी व पुतळ्या अवतीभवती घाण कचरा टाकण्यापासून नागरिकांना रोखण्याचे ग्रामपंचायतिने आवाहन करावे. याकरिता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा महासचिव संदीप श्रीहरी पोडे,यांनी ग्रामपंचायत कार्यालय विसापूर यांना निवेदनाद्वारे विनंती केली होती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज,, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, संत श्री रविदास महाराज. इत्यादी सर्व महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे विसापूर येथे आहेत. मात्र पुतळ्याच्या अवतीभवती कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळते पुतळ्या अवतीभवती चांगल्याच प्रमाणात कचरा दिसून येतो व महापुरुषांना ग्रामपंचायत मार्फत आठवड्यातून एक ते दोन दिवस महापुरुषांच्या पूर्णकृती पुतळ्याला पाण्याने धुवावे अशी मागणी संदीप पोठे यांनी निवेदनातून केलेली होती व आज त्या कामाला सुरुवात ग्रामपंचायत मार्फत सुरु झालेले आहे. व श्री. संदीप भाऊ पोडे यांच्या मागणीला यश आले.
विसापूर ग्रामपंचायत च्या लोकप्रिय सरपंच वर्षाताई कुळमेथे यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आलेली आहे सरपंच यांनी हा विषय मासिक सभेमध्ये घेऊन अवघ्या एक-दोन दिवसांमध्ये मार्गी लावू असे आश्वासन देण्यात आलेले होते व आज दिनांक 18 jun 2025 ला ग्रामपंचायत कार्यालय मार्फत पुतळे सफाई करून परिसर स्वच्छ कारण्यांचे कामं सुरु झाले आहे, करिता ग्रामपंचायत विसापूर सरपंच, सौ, वर्षा कुळमेथे मॅम यांचे मनःपूर्वक आभार :- संदिप पोडे -युवा मोर्चा जिल्हा महासचिव



कोणत्याही टिप्पण्या नाहीत