Breaking News

पालगाव आंदोलनाची यशस्वी सांगता : कामगारांच्या संयमाला यश

 पालगाव आंदोलनाची यशस्वी सांगता : कामगारांच्या संयमाला यश

महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,  कोरपना  – पालगाव येथील सुरु असलेल्या कामगारांच्या आंदोलनाची अखेर यशस्वी सांगता झाली आहे. आमदार देवरावजी भोंगळे यांच्या मध्यस्थीनंतर कंपनी प्रशासन आणि कामगार प्रतिनिधींमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून, पालगाव रोड ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करून देण्याचे लेखी आश्वासन कंपनीने दिले आहे.

कामगारांच्या रास्त मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही कामगारावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे कंपनी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

यावेळी आमदार देवराव भोंगळे म्हणाले, "कामगारांच्या हितासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. जनतेचा सेवक म्हणून या लढ्याला पाठींबा दिला आणि पुढेही देत राहणार. कामगारांचा संयम आणि एकजूट हेच या यशस्वी आंदोलनाचे खरे कारण आहे."

महत्वाचे ठळक निर्णय:

  • पालगाव रोडचे काम ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन
  • कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार
  • आंदोलनात सहभागी कोणत्याही कामगारावर कारवाई नाही
  • आमदार देवराव भोंगळे यांची ठाम भूमिका आणि सक्रिय मध्यस्थी

या आंदोलनाच्या निमित्ताने स्थानिक कामगारांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळाला असून, संवादातूनच मार्ग निघतो याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत