Breaking News

विसापूर येथून भाजप युवा मोर्चा सचिवपदी करण कुमले यांची नियुक्ती — सामाजिक कार्याला मिळालं राजकीय स्वरूप

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हाकानी, चंद्रपूर, बल्लारपूर : विसापूर येथील तरुण आणि उत्साही सामाजिक कार्यकर्ते श्री. करण भाऊ कुमले यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सचिवपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातील सक्रिय सहभाग, लोकाभिमुख दृष्टिकोन, आणि युवकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता ओळखून ही जबाबदारी देण्यात आली आहे.

ही निवड बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपचे वरिष्ठ नेते किशोरजी पंदीलवार, व विसापूर मंडळ अध्यक्ष गणेशभाऊ टोंगे यांच्या मार्गदर्शनात पार पडली. तसेच संदीप भाऊ पोडे, नितीनजी पादे व सुरजजी टोमटे यांच्या नेतृत्वात विसापूर परिसरात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांमध्येही या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण आहे.

श्री. करण कुमले हे अनेक वर्षांपासून विसापूर व परिसरात विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय आहेत. तरुणांच्या अडचणी, शिक्षण, रोजगार, आणि सार्वजनिक सुविधा याविषयी सातत्याने आवाज उठवणारे म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यातली तळमळ, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची जाण लक्षात घेता भाजपने त्यांना पक्षाच्या युवक संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.

भाजपचा एक महत्त्वाचा विशेष म्हणजे सामान्य कार्यकर्त्यालाही मोठ्या पदावर संधी देण्याचा पक्षाचा नेहमीच भर राहिलेला आहे. करण कुमले यांची निवड याच परंपरेचं उदाहरण ठरत आहे. युवा वर्गात नेतृत्व निर्माण करणे व अधिकाधिक तरुणांना समाजकार्यात सहभागी करून घेणे, हे युवा मोर्च्याचं प्रमुख उद्दिष्ट असून त्याच दिशेने करण कुमले यांचं कार्य प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक युवक, महिला व नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असून विसापूर परिसरात आनंदाचं वातावरण आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत