परमीट बार अन्ड रेस्टारंट FL-III वर शासनाने लावलेला १०% टक्के विक्री कर रद्द करण्याची मागणी.
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी, बादल बेले, राजुरा : महाराष्ट्र शासनाने परमीट बार व रेस्टारंट FL.-III वर १०% टक्के विक्री कर लावलेला आहे आणि दर सुध्दा वाढविले आहे. तसेच लायसन्स फी सुध्दा वाढविली आहे. त्यामुळे ग्राहकावर अतिरिक्त भार पडल्यामुळे परमीट बार अॅन्ड रेस्टारंट FL-III मध्ये ग्राहकांनी येणे बंद केल्यामुळे परमीट बार व रेस्टारंट बंद होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची परिस्थिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यांना रोजगारापासून वंचित राहण्याची स्थिती निमार्ण झालेली आहे.
एवढेच नव्हे तर मोठया प्रमाणात अवैद्य धंदे सुरू असून पून्हा दरवाढीमुळे अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी शासनाने परमिट बार अॅन्ड रेस्टारंट FL-III वरील लावलेला १० टक्के विक्री कर रद्द करण्यात यावा अशी मागणी राजुरा तालुक्यातील परमीट बार अॅन्ड रेस्टारंट FL-III चे परवानाधारक संघटनेच्या वतीने राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गौड यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री व राज्य उत्पादन शुल्क विभाग, मुंबई यांना सुद्धा देण्यात आल्या आहेत तसेच हा अतिरिक्त कर रद्द करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राजुरा तालुका बार अन्ड रेस्टारंट असोशियन चे अध्यक्ष तथा ए - 1 बारचे संचालक कोमल फुसाटे, शुभम बारचे संचालक स्वामी येरोलवार, प्रदिप बारचे संचालक प्रदिप धोटे, अण्णा बारचे संचालक रवी अक्कलवार, समानतका बारचे संचालक श्रीनिवास गोदागोनीवार, विजय बारचे संचालक अक्षय महानंद, ग्रीन पार्क बारचे संचालक पंढरी बोंडे, चेतन बार चे संचालक संजय रणदिवे, बैठक बारचे संचालक पराग दातारकर, स्टार वारजे संचालक जितेंद्र तळजेजा, लकी बारचे संचालक बबलू बघेल, प्रशांत बारचे संचालक विजय साळवे, सिस्टम बारचे संचालक शेखर सेपूरवार, अलंकार बारचे संचालक अशोक येलेकर, प्रिती बारचे संचालक व्यंकटेश बाळरागीवार, सनी बारचे संचालक संतोष चन्ने, विहान बारचे संचालक राम जाधव, पॅराडाईज बारचे संचालक संदिप लोनगाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत