अवैध धंदे बंद करा शेणगाव वासियांनी ठाणेदार जाधव यांना दिलेले निवेदन
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : जिवती तालुक्यात अवैध धंद्याला आले सुगीचे दिवस. कोणी उठला की अवैध धंद्याचे व्यवसाय करत आहे. या अवैध धंद्यामुळे गावातील वातावरण दिवसेंदिवस चिघळत असल्यामुळे तालुक्यातील काही गावांतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे गावातील महिला मंडळी व पुरुष मंडळी यांनी एकीकडून गावातील अवैध धंदे बंद पाडण्याची शपथ घेतली आणि तालुक्यातील काही गावातील लोक जिवती पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनात समोर येऊन अवैध धंदे बंद करायचे असे ठरवून गावातील अवैध धंद्याच्या विरोधात बंड पुकारले आहे. शेणगाव येथील अवैध दारू विक्री, जुगार व इतरही अवैध धंदे बंद करण्याबाबत आज दिनांक १८ ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन जिवती येते ठाणेदार जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात खालील प्रमाणे मागणी करण्यात आली.
मौजा शेणगांव ता.जिवती येथे खुलेआम धाबे टाकून व काही प्रमाणात घरातून, देशी-विदेशी, डुबलीकेट दारू, मोहा दारू विक्री केली जात आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहे व उध्वस्त होत आहे. कॉलेजला जाणारे युवा पिढी व तसेच शाळेत जाणारे अल्पवयीन विद्यार्थी या अवैध दारूच्या धाब्यावर गर्दी करतांना दिसत आहे. येणारी पिढीही बरबाद होण्याच्या मार्गावर असून व तसेच काही पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेल्यामुळे घरातील भांडे बासन, धान्य व इतरही महागडे वस्तू विकून दारू पीत आहे.
गावात दररोज पती-पत्नीचे भांडण व व इतरही लोकन सोबत तंटे भांडण होताना दिसत आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाचे रोजी खुलेआम दारू विक्री सुरू होती. मोठ्या प्रमाणात जुगार व मोबाईलवर ऑनलाइन सट्टा, लुडो गेम सुरू असल्यामुळे दररोज लाखो रुपये या जुगारात लावण्यात येत आहे. युवा पिढी बरबाद होत आहे यामुळे आर्थिक अडचणी निर्माण झाल्यावर युवा पिढी इतर गैरमार्ग पत्करू शकतात याच्यात काही शंका नाही. समोर गणेश उत्सव,बैल पोळा व इतरही सण येणार आहे. दारूच्या व्यसनामुळे व इतरही व्यसनामुळे तंटे भांडण होण्याची शक्यता नाकरता येत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे व इतरही अवैध धंदे गावात सुरू असून ही सर्व माहिती आपल्याला असून सुद्धा आपण या अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. आपण तात्काळ हे सर्व अवैध धंदे बंद करावे अशी निवेदन कर्त्यांनी आग्रहाची विनंती केली आहे.
आपण हे अवैध धंदे तात्काळ बंद नाही केल्यास आपल्या पोलीस स्टेशन च्या आवारात संविधानीक मार्गाने आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असा इशारा निवेदनातून देण्यात आला. ठाणेदार प्रवीण जाधव यांनी निवेदन करताना आश्वासन दिले की तुम्ही गावकऱ्यांनी सहकार्य करावे मी तुम्हाला गवई देतो की गावातील एकही अवैध धंदे चालू देणार नाही असे आश्वासन देण्यात आले. निवेदन देताना नरेश हामणे उपसरपंच ग्रामपंचायत शेणगाव, प्रल्हाद राठोड तमुस अध्यक्ष, महादेव डोईफोडे माजी तमूस अध्यक्ष, रमाकांत माने पोलीस पाटील, नंदाताई मुसने ग्रा.पं. सदस्य, अजय तिरणकर ग्रा.पं.सदस्य, शब्बीर जागीरदार पत्रकार, हकानी शेख पत्रकार, अमोल कांबळे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, रफिक पठाण, लक्ष्मण मुंडे, विठ्ठल केजगिर, माधव शेंबळे, बालाजी वाघमारे, माधव कांबळे, चंद्रकांत जाधव, अर्चना खंदाडे, शेषाबाई वंगवाड, निलाबाई जाधव, महानंदा कदम, चंद्रकला चोले, केवळबाई गिरमे, संगीता जाधव, फुलाबाई जाधव, जनाबाई पवार, ललिताबाई रंभाजी, सुनिता पवार, इतर गावातील महिला व पुरुष उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत