यादवराव धोटे महाविद्यालयात राजुरा मुक्ती संग्रामदिन उत्साहात साजरा
महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी, सुवर्णा बेले, राजुरा : ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा यांच्या संचलनाखालील ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात राजुरा मुक्ती संग्रामदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
सकाळी नेमक्या ८ वाजून १० मिनिटांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे तसेच संस्थेचे कोषाध्यक्ष सतीश धोटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर त्यांनी सर्वांना राजुरा मुक्ती संग्रामदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. लगेचच राज्यगीताचे सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव डॉ. अर्पित धोटे, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मीनाक्षी कालेश्वरवार, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा पोडे, पर्यवेक्षक प्रा. इर्शाद शेख, तसेच अमेय धोटे, अभिलाष धोटे, प्राध्यापक, कर्मचारीवृंद आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ या थोर नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वर्षा पोडे यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. आसावरी जिवतोडे यांनी केले. देशभक्तीच्या गजरात व उत्साहपूर्ण वातावरणात झालेला हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत